Google Ad
Uncategorized

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी ‘या’ वेळेत दोन तास बंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जुलै) : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहाटे अडीचपर्यंत दरड हटविण्यात आली होती.

त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या होत्या. तर एक लेन अजुनही बंद आहे. मात्र आता दुपारी दोन तास मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Google Ad

वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांची अडचण झाली आहे. त्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नोकरदार वर्गाची पंचाईत झाली आहे.

दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटविण्यात येणार आहे. दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाला लागल्या होत्या. आता दोन लेन सुरू असल्या तरी मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!