महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे परिसरातील 23 गावांच्या समावेशाचा अध्यादेश राज्य सरकारने काढल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाले आहे. नव्या गावांच्या समावेशाने पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबईला मागे टाकत राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे. गावांच्या समावेशाचा अध्यादेश जारी झाल्याने या गावांपैकी तीन ग्रामपंचायतींची जाहीर झालेली निवडणूक रद्द होण्याची शक्यता आहे.
11 गावांसह पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ 331 चौरस किलोमीटर इतके होते. नव्या 23 गावांच्या समावेशाने हे क्षेत्रफळ 485 चौरस किलोमीटर होणार आहे. त्यामुळे मुंबईला मागे टाकत पुणे हे आकाराच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे. 23 गावांच्या समावेशामुळे महापालिकेच्या हद्दीत सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येची भर पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरच्या फाईलवर स्वाक्षरी करून ही प्रक्रिया गतिमान केली होती.
समावेश होणाऱ्या गावांची नावे पुढीलप्रमाणे
1)म्हाळुंगे
2)सूस
3)बावधन बू.
4)किरकिटवाडी
5)पिसोळी
6)कोंढवे-धावडे
7)कोपरे
8)नांदेड
9)खडकवासला
10)मांजरी बु.
11)नऱ्हे
12)होळकरवाडी
13)औताडे- हांडेवाडी
14)वडाची वाडी
15)शेवाळेवाडी
16)नांदोशी
17)सणसनगर
18)मांगडेवाडी
19)भिलारेवाडी
20)गुजर-निंबाळकरवाडी
21)जांभूळवाडी
22)कोळेवाडी
23)वाघोली
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…