Mumbai : शिवसेनाप्रमुख स्व . बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून … मुंबईत उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आज संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि २३ जाने. ) : वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर आरोपांचे फैरी झाडणारे नेते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राला एक चांगली राजकीय परंपरा आहे. राजकारण आणि वैयक्तिक संबंध या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. हे दोन्ही टोक एकमेकांजवळ कधीच पोहोचत नाही, असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येक पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचा संबंध होता.

महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा अजूनही तशीच अबाधित आहे हे आजच्या कार्यक्रमातून सिद्ध होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी सर्वच पक्षातील राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

3 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

6 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

6 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

1 week ago