महाराष्ट्र 14 न्यूज : मीरा-भाईंदरच्या भाजप नगरसेविका नीला तनेजा-सोन्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी तनेजा यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. यामुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नीला तनेजा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र बनवले असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. तनेजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश समितीने दिले आहेत.
नीला तनेजा यांनी मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर मेहतांवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तनेजा यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरल्याने नरेंद्र मेहता यांना अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून दिलासा मिळू शकतो. तनेजा यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…