Mumbai : मोठी बातमी … खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज होणार बैठक!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७जून) : आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक होईल. संध्याकाळी पाज वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक देखील उपस्थित असतील. बुधवारी कोल्हापुरात मराठा आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती मोर्चाकडून आयोजित करण्यात आलेला मूक आंदोलन पार पडलं.

बुधवारी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विविध पक्षांचे आमदार तसंच खासदार यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन पार पडलं. या मूक आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. या आंदोलनावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतीश पाटील आणि राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी संभाजीराजे छत्रपती तयार असल्यास त्यांची लगेचच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणू, असं आश्वासन मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या समोर बोलताना दिलं होतं.

त्यानंर मूक आंदोलन संपल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राज्यभरातून आलेले मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक यांची त्याच ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनाला प्रतिसाद देत उद्याच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन बैठक करण्याचं निश्नित करण्यात आलं. बैठकीत ठरल्यानुसार आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल. या बैठकीत काय चर्चा होते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

22 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago