महाराष्ट्र 14 न्यूज : संपुर्ण महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंटस् को- ऑप. बँक लिमिटेड च्या जनसंपर्क संचालक पदी सौ रजनी जातेगांवकर यांची तर उपाध्यक्ष पदी हरीश लोढा याची झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत बहुमताने निवड करण्यात आली.
गेल्या तीन दशकांपासून सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रजनी जातेगांवकर या २० वर्षांपासून नामको बँकेच्या संचालक पदी निवडून येत आहेत.
संपुर्ण बँकिंग क्षेत्र कोरोनाच्या काळात आणि त्यातही सहकार क्षेत्र आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. नामको सभासदांना रोजच्या बँकिंग सेवे बरोबरच गुंतवणूक, इन्शुरन्स या सर्व सेवा एकाच छत्राखाली देण्याचा मानस या प्रसंगी जातेगांवकर यांनी बोलून दाखविला.
जनसंपर्क संचालक या पदाच्या माध्यमातून बँक सेवा सभासदांच्या अधिक जवळ घेऊन जाण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. बँक वाढीसाठी सर्व शाखाशी सुसंवाद साधुन सर्व सभासद बँक शाखा आधिकारी आणि बँक प्रशासन ह्यांच्यातील संवाद अधिक सहज आणि सकारात्मक करण्यासाठी नामकोचे अध्यक्ष विजय साने, उपाध्यक्ष हरिष लोढा, ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी, वसंत गिते, शोभा छाजेड, हेमंत धात्रक आणि इतर संचालक या सर्वांच्या सोबतीने अधिक क्रियाशीलता आणण्यासाठी कटिबद्ध असणार असे त्यांनी निवड प्रसंगी नमूद केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…