Categories: Editor Choice

सैनिक युवा फोर्स कडून “सेना दिन” उत्साहात संपन्न … पिंपरी चिंचवड मधील  शाळांकडून संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जानेवारी) :  : रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी कै मोरू महादू बारणे क्रीडांगण वनदेव नगर थेरगाव या ठिकाणी सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमी यांच्या वतीने सेना दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने वीर माता वीर पत्नी यांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला, तसेच वीरमाता व वीरपत्नी यांचा यथोच्छितरित्या सन्मान करण्यात आला. तसेच सोशल हॅंड्स फाऊंडेशन कडून साडी भेट देऊन वीरमाता व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड मधील लक्ष्मीबाई बारणे विद्यालय, गॅलेक्सी किड्स स्कूल, एस.पी इंग्लिश मिडियम स्कूल, जर्म्स न पर्ल्स स्कूल, ओर्किड इंग्लिश मिडियम स्कूल, संचेती हाय स्कूल व इतर  शाळा सहभागी झाल्या होत्या. शाळांच्या वतीने संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

भारतीय लष्कराचा आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 15 जानेवारी रोजी ‘भारतीय सेना दिन’ साजरा केला जातो. लष्कर दिनानिमित्त देशाच्या विविध भागात भारतीय लष्कराच्या शौर्याबद्दल आणि बलिदानाबद्दल आदर व्यक्त केला जातो. या दिवशी मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांनाही श्रद्धांजली वाहण्यात येते. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी समजावून घेऊन, शहिदांचे परिवारातील वीरमाता व वीरपत्नी यांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल विजय वेसवीकर (भारतीय माजी सैनिक संघटना पुणे अध्यक्ष )व रिटायर्ड श्री के इंदूप्रकाश मेनन (JWM ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड) होते.

यावेळी मदनलाल धिंग्रा यांचे वंशज जगमोहन धिंग्रा, सैनिक युवा फोर्सचे संचालक रामदास मदने कारगिल सहभाग उपसंचालक अशोक जाधव, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, एन एस जी कमांडो चंद्रकांत कडलग, अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मोहनिष बारिया, कृषी पुरस्कार विजेते कैलास जाधव, सेनेतील निवृत्त पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेना दिवस 24 मराठा लाईट इनफंट्री मिलिटरी बँड सह साजरा करण्यात आला. कर्नल विजय वेचवीकर यांनी परेडची सलामी घेत निरीक्षण केले. आजपर्यन्त शहिद झालेल्या सर्व जवानांना उपस्थित मान्यवरांनी श्रध्दासुमन अर्पित केले. सर्व शाळांतील विद्यार्थांच्या कलागुणांना वावा देण्यात आला. त्यामध्ये मुख्यत्वे महाराष्ट्राच्या पारंपारिक खेळ लेझिम याची सुंदर प्रात्यक्षिके विद्यार्थांनी सादर केली. काही विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या योगा, लाठीकाठी, तलवारबाजी अशीही प्रात्यक्षिके दाखविली. योग्य वयात अंगामध्ये शिस्त बानविण्यासाठी व जगण्यासाठी एक ध्येय मनात ठेवणे, देशभक्तीची ज्वाला सतत प्रज्वलित ठेवत देशासाठी काही ना काही करत जगण्याचे उमेद असावी, असा सर्व मान्यवरांकडून संदेश घेऊन सर्व विद्यार्थी प्रफुल्लीत मनाने कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या घराकडे रवाना झाले.

सर्व मान्यवरांचा सैनिक युवा फोर्स कडून योग्य सन्मान करण्यात आला. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थांना प्रशास्तीपत्रक व मेडल देण्यात आले. सोलापुरातील जागतीक विक्रमवीर प्रशांत विजय उर्फ कवी प्रवि यांनी स्वरचीत हिन्दी कविता ‘तिरंगा यही मजहब हमारा’ सादर करून ऊयापस्थित मान्यवर आणि शिक्षक, विद्यार्थी व प्रेक्षकांची मने जिंकली. “वंदे मातरम “ ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभद्रा फाउंडेशनच्या सौ.माधवी जनार्धन यांनी केले. सैनिक युवा फोर्स चे संचालक रामदास मदने यांनी आभार व्यक्त केले.

Maharashtra14 News

Recent Posts

अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद पहिल्याच दिवशी ४८,७६३ जणांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…

4 days ago

द न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…

2 weeks ago

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकांच्या हक्काच्या घराचा “सदनिका हस्तांतरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…

2 weeks ago

सावधान ! आता… पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर

सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…

3 weeks ago