Mumbai : मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा … जीव झाला येडापिसा’मधील अभिनेत्याचं कोरोनामुळं निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१मे) : कोरोना बळींचं चक्र काही थांबताना दिसत नाहीय. एका पाठोपाठ एक लोकांना कोरोनामुळे आपल्या आयुष्याला मुकावं लागत आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनाचं कोरोनाचा फटका बसत आहे. नुकताच मराठीतील प्रसिद्ध मालिका ‘जीव झाला येडा पिसा’ मध्ये ‘भावे’ ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेता हेमंत जोशी याचं कोरोनाने निधन झालं होतं. याबद्दलची भावुक पोस्ट करत अभिनेत्री सुमेधा दातारने म्हटलं,’भावपूर्ण श्रद्धांजली, असं लिहायला मनचं धजत नाहीय’, पाहूया काय आहे सुमेधाची पोस्ट.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः सर्वांना हादरून सोडलं आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांची. 19 मे ला हेमंत जोशी या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यांनी कलर्स मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘जीव झाला येडा पिसा’ मध्ये ‘भावे’ ही भूमिका साकारली होती. ते अत्यंत दिलखुलास स्वभावाचे होते. सेटवर ते नेहमी हसत खेळत असायचे.त्यांचा हा मनमौला अंदाज सगळ्यांनांच भावत होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या सह कलाकारांना विश्वासचं बसत नाहीय.

जीव झाला येडा पिसा मध्ये ‘विजया काकी’ ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इन्स्टाग्रामवर हेमंत यांचा फोटो शेयर करत अत्यंत भावुक पोस्ट लिहली आहे. सुमेधाने पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘”भावपूर्ण श्रद्धांजली” असं लिहायला मनच धजत नाहीयेहे दिलखुलास हास्य ,ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटीसतत हसतमुख व्यक्तिमत्त्वकसे आहात विचारलं की स्टायलित उत्तर एकच …”ऐश” माझ्या आयुष्यातील पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग मी हेमंत जोशींबरोबर केलं, तिथपासून जीव झाला येडापिसा पर्यंतचा प्रवास…आणि काल अचानक भावे गेले …किती वेळ, अजूनही पटतच नाहीये जिथे कुठे असाल तिथे तुमच्या भाषेत “ऐश” करा’ अशा आशयाची ही पोस्ट लिहत सुमेधाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

13 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

18 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago