कारची चावी हरवली तरी आता नो टेन्शन … तुमचा मोबाईल उघडेल दार

महाराष्ट्र 14 न्यूज : आपल्यापैकी अनेकांना चावी विसरण्याची सवय असते. काहीजण चावी गाडीलाच विसरतात तर काहीजण कुठेतरी चालता-फिरताना किंवा बसल्यानंतर त्याच ठिकाणी चावी विसरून जातात. त्यामुळे आपल्याला अनेकदा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता गुगलकडून लवकरच Car Key app कार की फीचर यूजरसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

तसं बघायला गेलं तर कार की फीचर ॲपल (Apple user car key) युजरसाठी गेल्या वर्षभरापासून उपलब्ध आहे. ॲपलच्या आयफोनमध्ये कार की फीचर (iphone car key feature) ॲड करून जवळपास वर्ष झालं आहे. ऍपल युजर्स आता गाडी सुरू करण्यासाठी तसेच दरवाजा उघडण्यासाठी या ॲपचा उपयोग करत आहेत. आता गुगलकडून गुगल I/O संमेलनामध्ये हे ॲप युजर्ससाठी वर्षभराच्या आत निर्माण केले जाईल, असं सांगितलं आहे.

या अँड्रॉइड फोनमध्ये मिळेल हे फीचर
अँड्रॉइड 12 शी संबंधित असलेलं हे फिचर तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनला कारची चावीमध्ये बदलवू शकतं. मात्र, सध्या ही सुविधा केवळ Google Pixel पिक्सेल आणि Samsung Galaxy च्या फोनमध्येच उपलब्ध आहे. हे फीचर सध्या वर्ष 2021 मधील काही निवडक कारच्या मॉडेलसाठी आणि BMW सह अन्य कंपन्यांच्या 2022 मध्ये येणाऱ्या काही मॉडसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
हे अरुण गवळीच्या दगडी चाळीच्या जागी उभारणार 40 मजली टॉवर; म्हाडाने सुरू केली पुनर्विकासाची प्रक्रिया, सर्व 10 इमारती पाडणार
‘डिजिटल कार की’ हे अल्ट्रा वाइडबँड (यूडब्ल्यूबी) तंत्रज्ञानावर कार्य करते. हे एक प्रकारचे रेडिओ ट्रांसमिशन तंत्र आहे. ज्यामध्ये सेन्सर लहान रडार म्हणून कार्य करत असतो आणि सिग्नलची दिशा सांगू शकतो. यासह, आपल्या फोनमध्ये उपस्थित अँटेना यूडब्ल्यूबी तंत्रज्ञानासह सज्ज असलेल्या गोष्टी शोधू आणि ओळखू शकतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं अँड्रॉइड वापरकर्ते त्यांची कार लॉक किंवा अनलॉक करू शकतात. तसेच ज्यांच्या कारमध्ये एनएफसी (NFC) तंत्रज्ञानाची सोय आहे, असे कारमालक फोनवर टॅप करून त्यांच्या कारचा दरवाजा उघडू किंवा बंद करू शकतात.

डिजिटल चावी शेअर करण्याचीही सोय
गुगलकडून सांगण्यात आले आहे, की तुम्ही आपल्या मित्राला किंवा नातेवाईकांना कारची आवश्यकता असेल तर आपण सुरक्षितपणे ही डिजिटल चावी त्यांना मोबाईलवरूनच शेअर करू शकतो. त्याचा उपयोग करून ते गाडी ऑपरेट करू शकतात.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 day ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago