Categories: Uncategorized

या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात … पहा, फक्त ११ दिवसांत किती लोकांना झाला आजार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ ऑगस्ट) : राज्यात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फक्त ११ दिवसांत १ लाख जणांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. १० ते २० ऑगस्ट या ११ दिवसांत राज्यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना डोळे आले आहेत. या आजाराच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये मागील ११ दिवसांत ९७८८ डोळे आले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून संसर्गाच्या आजाराची साथ सुरु आहे. सर्वत्र सुरु असलेल्या या साथीपासून लहान मुले सुटलेली नाही. हा आजार संसर्गाच्या असल्यामुळे मुलांना शाळांमधून सक्तीची सुटी घ्यावी लागत आहे.

संसर्गाची मुले शाळेत आल्यास त्यांना घरी पाठवले जात आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात फक्त ११ दिवसांत १ लाख जणांना हा संसर्ग झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पुणे शहरानंतर अमरावतीमध्ये ६,७२४, जळगावमध्ये ५,९३०, नांदेड ५,५४८, चंद्रपूर ५,२९२, परभणी ४,६२० इतके रुग्ण सापडले आहे. या आजाराचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.▶️आजारावर काय आहे उपाय :-

डोळे येणे आजार आल्यास घाबरून जाऊ नये. हा औषधांशिवाय बरा होता. त्यासाठी दिवसांतून पाच ते सहा वेळा डोळ्यांवर पाणी मारुन स्वच्छ करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त आठवड्याभरात हा आजार बरा होतो. डोळे आल्यावर इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून गॉगल वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीचा रुमाल, टावेल वापरु नये, डोळ्यांना सारखा हात लावू नये, हे उपाय डॉक्टरांनी सुचवले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

2 days ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

3 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago