महाराष्ट्र व14 न्यूज, (दि. ३ ऑक्टोबर २०२३) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागाच्या सेक्टर क्रमांक २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील वितरण व्यवस्थेमधील विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सकाळचा पाणीपुरवठा नियमीत वेळेनुसार होणार असुन संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होणार आहे.

तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे निवेदन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.