Nashik : राजकीय नेत्यांनाच गांभीर्य नसल्याने, आमदाराच लग्न पडणार महागात … कोरोना पॉझिटीव्ह भुजबळांमुळे शरद पवारांच्यासह अनेक नेते क्वारंटाईन!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढू लागला आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधत आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे राजकीय नेत्यांनाच गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी आमदार सरोज आहेर यांच्या मुलाचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले.

या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील उपस्थिती लावली होती. दरम्यान, आज छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनीच कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या संपर्कात येणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.आमदार सरोज आहेर यांचा नाशिक शहरात विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळींनी उपस्थिती लावली होती. तर बहुतांश नागरिकांनी मास्क देखील घातले नव्हते. तसेच मोठ्या संख्येने गर्दी असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे देखील पाहण्यास मिळाले. त्यामुळे लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि राजकीय नेत्यांना वेगळा न्याय, असा प्रश्न आता उपस्थितांकडून विचारण्यात येत आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दिवसभरात अनेक बैठका घेतल्या होत्या. तसेच ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हॅलिपॅडवरुन आणण्यासाठी देखील गेले होते. तसेच त्यांना सोडण्यासाठीही गेले होते. त्यामुळे दिवसभर शरद पवार भुजबळांच्या संपर्कात होते. त्यामुळे आता शरद पवार यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तसेच पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहानानंतर येत्या १ मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago