Categories: Uncategorized

मा. आमदार रमेशआप्पा थोरात यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी सलग आठव्यांदा बिनविरोध निवड … दौंड तालुक्यात पेढे वाटून जलोष्यात स्वागत!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२डिसेंबर) : जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात हे अ गटातून बिनविरोध निवडून येत सलग आठव्यांदा जिल्हा बँकेवरती संचालक म्हणून निवडून आले आहेत. आज निर्धारित वेळेमध्ये भाजपचे अभिमन्यू गिरिमकर व राष्ट्रवादीचे अशोक खळदकर यांनी आपापले फॉर्म माघारी घेतल्याने थोरात यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. थोरात हे १९८५ पासून म्हणजेच गेली ३७ वर्ष सतत या बँकेच्या संचालक पदावर थोरात कार्यरत आहे. गेली सलग पाच वर्ष बँकेचे अध्यक्ष आहेत. या निवडीनंतर राष्ट्रवादी समर्थकांनी जल्लोष केला. पुणे येथे समर्थकांनी रमेश थोरात यांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. दौंड शहर केडगाव, यवत, वरवंड पाटस या परिसरामध्ये राष्ट्रवादी समर्थकांनी मिठाई वाटुन जल्लोष साजरा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून रमेश थोरात यांच्याकडे पाहिले जाते.

यावेळी रमेश थोरात म्हणाले, गट-तट विसरून गेली ३७ वर्षापासून तालुक्यातील व जिल्ह्यातील सभासदांची कर्ज वाटप करून सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच जिल्हा बँक देशामध्ये अव्वल बनली आहे. हा विजय सर्वसामान्य सोसायटी सभासद दौंड तालुक्यातील जनता, शेतकरी व मतदारांना समर्पित करतो.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

12 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

2 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

5 days ago