आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ‘ विविध कार्यक्रमांचे आयोजन … सांगवीतील पी डब्लू डी मैदानावर ६ फेब्रुवारी पासून भव्य ‘आमदार चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा!

महाराष्ट्र 14 न्यूज : चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त फुल पिच टेनिस बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील पी डब्लू डी मैदान येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ आणि पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ०९ .०० वा. पी डब्लू डी मैदान नवी सांगवी येथे होणार आहे.

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, यावर्षी दि. ०६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत शहरातील नामांकित क्रिकेट संघांना आमंत्रित करण्यात आले असून प्रत्येक संघास मयुरचे टी-शर्ट तसेच विजयी संघास रोख पारितोषिके आणि चषक व उत्तेजनार्थ वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या स्पर्धा तीन प्रकारात घेण्यात येणार आहेत, यामध्ये

🔴फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत :-
प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतिय क्रमांक चतुर्थ क्रमांक अनुक्रमे रु .१,००,१०० / -रु . ६१,००० /- रु .४१,००० /- रु .२१,००० / आणि चषक असे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, ही स्पर्धा शनिवार दि . ६/०२/२०२१ ते सोमवार दि . १५/०२/२०२१ पर्यंत असून यात ३२ संघ भाग घेतील यात मॅन आफ द सिरीज, फायनल मॅच, मॅन आफ द मॅच, बेस्ट गोलंदाज, बेस्ट फलंदाज असे भव्य चषक देण्यात येणार आहेत.

🔴सांगवी – पिंपळे गुरव प्रिमीयर लीग :-
या क्रिकेट स्पर्धेत एकूण १२ संघ असून प्रथम क्रमांक रु. ३१००० व द्वतीय क्रमांक रु.१५००० असे बक्षीस असून या स्पर्धा शनिवार दि . ६/२/२०२१ ते सोमवार दि . ८/२/२०२१ रोजी पर्यंत असतील.

🔴४०+ प्रथम क्रमांक रु. २५०००/- व ४०+ द्वीतीय क्रमांक रु.११०००/- बक्षीस असून या स्पर्धेत एकूण १६ संघ भाग घेतील तर स्पर्धा १३/२/२०२१ ते रविवार दि . १४/२/२०२१ रोजी होतील असे संयोजकांनी कळविले आहे.

🔴ओपन टिमचा हाफ दि . ० ९ / ०२ / २०२१ ते १२/०२/२०२१ ओपनची सेमी फायनल व फायनल मॅच १५/०२/२०२१ रोजी होईल .

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे फायनल सामने हे सोमवार दि . १५/२/२०२१ रोजी असे होणार आहेत.
🏏एक ओपन हाफ- पहिली सेमी फायनल – सकाळी ९ वा .
🏏दुपारी सेमी फायनल – सकाळी १०.३० वा .
🏏 ४०+ फायनल- दुपारी १२ वा .
🏏 सांगवी चॅम्पियन फायनल – दुपारी १.०० वा
🏏ओपन हाफ मेगा फायनल – दु .३ वा . होणार आहे.

🔴आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत मैदानातील सहकार्य :-
• जय गणेश क्रिकेट क्लब
• संजय दुधभाते प्रतिष्ठान
ओन्ली क्रिकेट क्लब
ब्राईट क्रिकेट क्लब
६९ क्रिकेट क्लब
जागरनॉट्स क्रिकेट क्लब
दोस्ती क्रिकेट क्लब
डेव्हलिस क्रिकेट क्लब
सुपर स्टार्स क्रिकेट क्लब
• शिवप्रहार क्रिकेट क्लब
हर्षल ढोर प्रतिष्ठाण , सांगवी.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago