आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळावेत म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनात उठवला आवाज!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ मार्च) : अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांकडून विविध शैक्षणिक कारणांसाठी घेतली जाणारी अनामत रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना परत देणे बंधनकारक असताना विद्यार्थ्यांच्या या हक्काच्या रक्कमेवर डल्ला मारला जात असल्याची धक्कादायक बाब आमदार लक्ष्मण जगताप यांनी समोर आणली आहे.

याप्रकरणी आमदार जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित करून राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची अनामत रक्कम परत करण्याबाबत शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे का असा जाब राज्य सरकारला विचारला. त्यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना देय असलेली अनामत रक्कम तत्काळ परत देण्याबाबत विद्यापीठांना व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात.

प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शुल्क घेतले जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडून विविध शैक्षणिक गोष्टींसाठीही अनामत रक्कम घेतली जाते. त्यामध्ये ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळेतील साहित्य हाताळणी, क्रीडा साहित्य यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये अनामत रक्कम म्हणून घेतली जाते. अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी अनामत रक्कम परत करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण शैक्षणिक करणांसाठी घेतलेली अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये टाळाटाळ करतात.
विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कमेपोटी घेतलेले कोट्यवधी रुपये राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पडून आहेत. विविध विद्यार्थी संघटनांकडूनही अनामत रक्कम परत मिळावी म्हणून मागणी केली जाते.

पण विद्यापीठ व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळावेत म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला. त्यांनी याप्रकरणी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यातील व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असताना महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळेतील साहित्य हाताळणी क्रीडा साहित्य आदींसाठी विशिष्ट रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवून घेतात हे खरे आहे का?, अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित रक्कम विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य असते हे खरे आहे का?, राज्यातील अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना अनामत रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येते हे खरे आहे का?, विद्यार्थ्यांच्या अनामत रक्कमेचे कोट्यवधी रुपये पडून असल्याचे उघडकीस आले आहे हे खरे आहे का?, हे कोट्यावधी रुपये विद्यार्थ्यांना परत मिळावेत यासाठी विद्यार्थी संघटनांकडून शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे हे खरे आहे का?, राज्याचे उच्च शिक्षण संचालक यांनी राज्यातील सर्व विभागीय संचालकांना पत्र पाठवून महाविद्यालयांकडे असणारे अनामत रकमेची माहिती देण्याचे आदेश मार्च २०२१ दरम्यान दिले होते हे खरे आहे का? असे प्रश्न विचारले.

या प्रश्नाचं उत्तर देताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. विद्यार्थ्यांना देय असलेली अनामत रक्कम त्यांना तत्काळ परत देण्याबाबत विद्यापीठांना व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी लेखी उत्तर दिले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

11 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago