Google Ad
Uncategorized

पुण्यातील ऐश्वर्य कट्ट्यावर जाग्या झाल्या दादा कोंडके-निळू फुलेंच्या आठवणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जून) : एरवी गप्पांमध्ये रंगून जाणाऱ्या ऐश्वर्य कट्ट्यावर आज दादा कोंडके व निळू फुले यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अढळ स्थान प्राप्त करणाऱ्या आणि आपला अमीट ठसा उटवणाऱ्या या दोन महान दिग्गजांच्या जीवनातील अंतरंगही आज उलगडले. कारण आजच्या कट्ट्याच्या मानकरी होत्या या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या कन्या. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले आणि सलग ९ सुपरहिट हाऊसफुल्ल चित्रपट देणारे विनोदसम्राट दादा कोंडके यांच्या कन्या तेजस्विनी कोंडके. या शिवाय पर्यावरणाच्या क्षेत्रात सजग पत्रकार म्हणून प्रदीर्घ काळ काम करणाऱ्या चैत्राली चांदोरकर या देखील कट्ट्यावर उपस्थित होत्या.

या सर्वांच्या सहभागाने एक अनोखी मैफिल आज रंगली. निळू फुले यांच्याविषयी सांगताना गार्गी फुले म्हणाल्या, पूर्वीच्या पिढीतील कलावंतांनी आपले सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवलेले होते. माझ्या बाबाचा स्वभाव अगदी भिडस्त होता. तो घरात पुस्तक वाचण्यात रमलेला असायचा. सामाजिक क्षेत्रात समाजवादी विचारांशी त्याची नाळ घट्ट होती. आई-बाबा मिळून कविताही करायचे.

Google Ad

दादांच्या आठवणी जागवताना तेजस्विनी कोंडके भावनाशील झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. त्या म्हणाल्या, दादा जसे बाहेर होते तसेच घरात होते. त्यांचा स्वभाव तापट होता पण तितकेच विनोदीसुद्धा होते. त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण भोरमधील इंगवली गावात केलेले होते. त्यांच्याकडे उपजत विनोद होता. बाळासाहेब ठाकरे यांनी दादांना खूप चांगला आधार दिलेला होता. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले. दादांचे नाव अधिक चांगल्या रीतीने पुढे येईल असे काहीतरी करण्याची मनापासून इच्छा आहे.

चैत्राली चांदोरकर यांनी पर्यावरण विषयात काम करतानाचे अनेक अनुभव सांगितले. पर्यावरण हा विषय आता लोकांच्या केंद्रस्थानी आला असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदवले. पर्यावरणाच्या प्रश्नांना मार्गी लावताना लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा असतो असे त्यांनी सांगितले.या तिन्ही मान्यवरांचे औक्षण करून शंखनादाने स्वागत करण्यात आले. मानाचा फेटा, शाल, मोत्याची माळ, सन्मानपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी एड. दिलीप जगताप यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी माझ्यासह पराग पोतदार, पांडुरंग मरगजे, विलासराव भणगे, सचिन डिंबळे, शंकरराव कडू, सर्जेराव शिळीमकर, संदीप फडके, रवींद्र संचेती, दिलीप जगताप, मंगेश साळुंखे, संदीप भोसले, अक्षय लिमन, सुनील सोनवणे, संतोष ढवण, दत्ता तोडकर, विकास डिंबळे, मयूर संचेती, स्नेहल कोंडे, प्रियांका अरगडे, प्रणोती कोंडके, हितेश तन्ना, अभिराज रेणुसे, मनोज तोडकर, रोहित रेणुसे, शिरीष चव्हाण आदी आप्पा रेणुसे मित्र परिवार उपस्थित होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!