जॉइंट रिप्लेसमेंटसाठी पिंपरी- चिंचवडच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये -मेको स्मार्ट रोबोटिक्स सिस्टीमची सुरवात
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ६ मे) : पिंपरी-चिंचवड, येथील साईनाथ हॉस्पिटल ने, नुकतीच यूएस एफडीए-मान्यता प्राप्त मेको रोबोटिक आर्म-असिस्टेड टेक्नॉलॉजी लाँच करून गुडघा आणि हिप रिप्लेसमेंटमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. साईनाथ हॉस्पिटलमध्ये मेको स्मार्टरोबोटिक्स सिस्टीम सुरू करण्यात आली असून सर्जन्सच्या टीमने या प्रणालीसह १०० शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
गुडघा आणि हिप जॉईन्टच्या विकारांनी ग्रस्त रूग्णांसाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार सुरू करने हा या हॉस्पिटलसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. मेको रोबोटिक आर्म-असिस्टेड सर्जरी सर्जनना अधिक अचूकतेसह आणि अधिक परिणामकारतेने शस्त्रक्रिया पुर्ण करण्यात सक्षम बनविते.
साईनाथ हॉस्पिटल चे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुहास कांबळे, ज्यांनी नुकत्याच मेकोद्वारे १०० शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, ते म्हणाले, “पारंपारिक शस्त्रक्रियेतील आव्हानांपैकी एक म्हणजे शस्त्रक्रियेची अचूकता ही बहुतेक सर्जनच्या अनुभवावर आणि तंत्रावर अवलंबून असते. मेको तंत्रज्ञानाच्या मदतीने, सर्जन बोन्स कटमध्ये अचूकता आणू शकतात. ज्यात बोन्स कटिंगसाठी पहिल्यांदा व्हर्च्युअल ३ डी मॉडेलचा वापर होतो आणि नंतर ऑपरेटिंग रूममध्ये प्रत्यक्ष पद्धतीने, ज्यामुळे तंतोतंत बोन कट करणे सोपे होते. ही पद्धत्ती अधिक अचूक तर आहेच याच बरोबर हॅप्टिक्स तंत्रज्ञानामुळे सॉफ्ट टिश्यू इन्जुरी देखील कमी होते आणि शस्त्रक्रियेसाठी केले जाणारे कट्स देखील कमी होतात, ज्यामुळे रुग्ण पहिल्या तुलनेने जलद बरे होते. या तंत्रज्ञानामुळे आम्ही आमच्या रुग्णांबद्दल अधिक जाणून घेण्याच्या बाबतीत आता पूर्वीपेक्षा अधिक सक्षम बनलो आहोत. ”
प्रत्येक रुग्णाची हाडांची शरीररचना वेगळी असते आणि ऑपरेशन्स द्वारे यात बदल करतात. गुडघा किंवा हिप्सच्या शस्त्रक्रियेच्या बाबतीत, मेको सिस्टमचे सॉफ्टवेअर रुग्णाच्या सीटी स्कॅनवर आधारित रोगग्रस्त सांध्याचे ३डी मॉडेल तयार करण्यात मदत करते. या नंतर प्रत्येक रुग्णासाठी त्यांच्या विशिष्ट आजाराच्या स्थितीवर आधारित वैयक्तिकृत आभासी शस्त्रक्रिया योजना तयार करता येते. ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच केलेले हे नियोजन अत्यंत अचूक हाडे कापण्यात आणि रोपणांचे संरेखन अचूक करण्यात मदत करते. तंत्रज्ञानामुळे सर्जनला आवश्यक असल्यास, शस्त्रक्रिये दरम्यान योजनेत बदल करता येऊ शकतो आणि योजना बनल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये बोन कट्स साठी देखील मेको सिस्टीमची सर्जनला मदत होते.तुलनेत सॉफ्ट टिश्यू ची हानी देखील कमी होते आणि . यामुळे अचूकपणे बोन्स कट करता येतात. इम्प्लांटची स्थिती निश्चित होते आणि सॉफ्ट टिश्युजला अन्य कोणत्याही दुखापती पासून संरक्षण मिळते.मेको रोबोटिक प्लॅटफॉर्म या एकाच प्लॅटफॉर्मवर पार्शल नी, टोटल नी, टोटल हिप रिप्लेसमेंन्ट सुविधा उपलब्ध आहे.
स्ट्रायकर इंडियाचे व्हीपी आणि जीएम, अमन ऋषी याबद्दल बोलताना म्हणाले, “आम्हाला साईनाथ हॉस्पिटलसोबत सहकार्य आणि असोसिएशन करताना खूप आनंद व अभिमान वाटत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणा द्वारे रुग्णांसाठी उपचार पद्धत्तीत सुधार करण्यासाठीची ही आमची अटूट बांधिलकी आमच्या भागीदारी मध्ये देखील दिसून येते . मेको सिस्टीमला भारतातील विविध शहरांतील सर्जन्स कडून सकारात्मक अभिप्राय मिळाला आहे, आणि त्याचे क्लिनिकल परिणाम देखील खुप चांगल येत आहेत. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल आणि गुडघा आणि नितंब बदल शस्त्रक्रियेच्या प्रगतीत योगदान दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या या टिम मनःपूर्वक अभिनंदन करतो”
मेको रोबोटिक-आर्म असिस्टेड टेक्नॉलॉजीचे क्लिनिकल यश हे मेको सिस्टम्सच्या १,८०० पेक्षा जास्त व सर्वात मोठ्या जागतिक इंस्टॉल बेसद्वारे, जगभरातील १,०००,००० पेक्षा जास्त मेको प्रोसिजर्स आणि प्रकाशित पीअर-रिव्हु रिसर्चमधील ३५० हून अधिक लेखांद्वारे दिसुन येत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप विजयी झाले आहेत.…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…