त्याचबरोबर महापालिकेनं सीसीसीचे 5 हजार बेड तयार करण्याचे नियोजन केल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. पुणे शहरातील कोरोनाची एकूण स्थिती पाहता खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बेड्सची उपलब्धता आणि भविष्यातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची गरज, लसीकरण मोहिमेला व्यापक रूप देणे, यावर सविस्तर आढावा आज महापौरांनी घेतला. तशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
शहरातील सर्व खासगी रुग्णालयाचे ८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 7 हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. शिवाय महापालिकेने सीसीसीचे 5 हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केलं आहे. त्यापैकी 1 हजार 250 बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय 1 हजार 450 बेड्सची तयारी सुरु आहे, असंही महापौरांनी सांगितलं आहे.
डॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे आणि गरजूंना कमीत कमी वेळेत बेड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत. शिवाय लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून व्यापकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत सूचना केल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…