मराठा आरक्षण : संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं ? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७जून) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात बुधवारी मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं त्यानुसार आता सह्याद्री अतिथीगृह येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत बैठक झाली. जवळपास दोन तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या केल्या
राज्य सरकार रिव्ह्यू पिटीशन दाखल करणार
पुढील आठवड्यात फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार
योग्य तयारी करुन कोर्टात भूमिका मांडू
संभाजीराजे यांच्या मागणीनुसार रविवारी सारथीबाबत उपमुख्यमंत्री बैठक घेतील
मराठा समाजाच्या रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लावण्याच्या एमपीएससीला सूचना
आपली चर्चा सुरू राहील तुम्ही आंदोलनाबाबत फेरविचार करावा असं मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं आहे
गुन्हे दाखल झालेले आहेत त्याबाबत एक केस वगळता इतर सर्व केसेसमधील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे
बैठकीत काय घडलं? बैठकीत जवळपास वीस मिनिटे संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या मागण्या मांडल्या. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

बैठकीत अशोक चव्हाणांनी म्हटलं, आम्ही पंतप्रधान यांना भेटलो त्यांना राज्याचे अधिकार कळवले. घटना दुरुस्ती नंतर राज्यांचे अधिकार कमी झाले आहेत. 50 टक्क्यांची मर्यादा काढल्या शिवाय रिव्ह्यू पिटीशन दाखल करता येणार नाही.
महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी म्हटलं, 1 तारखेपर्यंत अंतिम निकालाचे विषय प्रलंबित आहे. लवकरच कोपर्डी प्रकरणी न्यायालयात दाद मागू. रिव्ह्यू पिटीशन ड्राफ्ट तयार झाला असून पुढच्या आठवड्यात दाखल केल जाईल. केंद्र सरकारच रिव्ह्यू पिटीशन केवळ अधिकार राज्याचा की केंद्राचा यावर आहे. मात्र राज्य सरकारच रिव्ह्यू पिटीशन पूर्ण स्वरूपाचं राहील. 338 B विषय असा आहे की, प्रिव्हीव्हमध्ये दम नाही म्हणून हे पॅरलल केलं असा मेसेज जाईल.
छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर येत आहे.

▶️बैठकीतील राज्य सरकारकडे केलेल्या प्रमुख 5 मागण्या

1) मराठा आरक्षणामुळे 2014 ते पाच मे 2021 पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात.
2) ‘ओबीसी’च्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा
3) ‘सारथी’ संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ‘सारथी’ संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तत्काळ सुरू करावा. संस्थेला स्वायत्तता पुन्हा बहाल करावी.

4) अण्णासाहेब पाटील महामंडळाला दोन हजार कोटींचा निधी द्यावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रूपये करावी.
5) शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2000 रूपये प्रति महिना दिले जातात. ही रक्कम वाढवावी. शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीट्स निर्माण कराव्यात.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

13 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

2 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago