Categories: Editor Choice

गुढग्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक इच्छुक झाले सक्रिय … पिंपरी चिंचवड मध्ये ३४ ,तर पुण्यात ४३ ओबीसी ना मिळणार संधी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जुलै) : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातला ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया आयोगाने राज्यात 37 टक्के ओबीसी असल्याचं सांगत त्यांना 27 टक्के आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली आहे. त्यामुळे गुढग्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक इच्छुक आता सक्रिय व्हायला सुरुवात झाल्याचे आजच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर अनेक ठिकाणी दिसून आले.

या शिफारसीसोबतच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी आणि एसटी लोकसंख्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तिकडे ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. बांठिया आयोगाच्या या शिफारसींमुळे राज्यातील जिल्हा परिषद तसंच महानगर पालिकांच्या राखीव जागांवरही परिणाम होणार आहे. बांठिया आयोगाच्या शिफारसींबाबत मागासवर्ग आयोगाने निर्णय घ्यावा आणि 2 आठवड्यात निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मागची 2 वर्ष कोरोना व्हायरसमुळे बहुतेक महापालिकांचा कार्यकाळ हा संपला आहे, त्यामुळे राज्य सरकारने या महापालिकांवर प्रशासक नेमला आहे. आयुक्तांच्या मार्फत या महापालिकांचा कारभार चालत आहे. आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे पावसाळ्यानंतर या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) ओबीसी विभागाच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, पिंपरी, येथे आनंदोत्सव साजरा करून सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणा बाबत दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. तर पुण्यातही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

▶️आमदार महेश लांडगे यांनीही केले स्वागत :-
तर राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘आमच्या विचारांचे सरकार राज्यात आल्यावर तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण देणार…’’ असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अखेर खरा ठरला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिली.

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, …

ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नको, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. आज या निकालामुळे इच्छाशक्ती असेल, तर कोणताही प्रश्न कसा सोडवता येतो, याचा आदर्श महायुती सरकारने घालून दिला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभारही मानतो, असे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी म्हटले आहे.

▶️अशा आहेत 27 महापालिकांमधल्या ओबीसी राखीव जागा :-
मुंबई 61, ठाणे )- 14, नवी मुंबई- 23, कल्याण डोंबिवली- 32, उल्हासनगर- 21, वसई विरार – 31, भिवंडी-निजामपूर – 24, मिरा भाईंदर – 17, पनवेल- 20, पुणे – 43, पिंपरी चिंचवड- 34, कोल्हापूर – 19, सोलापूर – 27, सांगली कुपवाड – 21, नाशिक – 32, मालेगाव – 22, जळगाव – 20, धुळे- 19, अहमदनगर – 18, औरंगाबाद – 31, नांदेड – 21, लातूर – 18 , परभणी – 12, नागपूर – 33, अकोला – 21, अमरावती – 23, चंद्रपूर – 15

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

13 hours ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

3 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

3 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

3 days ago