Categories: Editor Choice

Mumbai : मॅनेजरची नोकरी गेली , महिन्यापासून ओला कारचा ड्रायव्हर .. भिवंडीत गाडीमध्येच गळा दाबून हत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ऑगस्ट) : मुंबई-नाशिक महामार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओला चालकाची गळा आवळून हत्या केल्याचं तपासादरम्यान समोर आलं. मयत 42 वर्षीय व्यक्ती भिवंडीचा रहिवासी होता.

▶️नेमकं काय घडलं?
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील माणकोली नाका येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभ्या असलेल्या व्हॅगन आर कारच्या ड्रायव्हरचा हा मृतदेह होता. या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची तपासणी केली. मृतदेहाच्या गळ्याभोवती आवळल्याचे व्रण दिसल्याने ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

▶️लॉकडाऊनमुळे काम बंद
प्रभाकर पांडू गंजी (वय 42 वर्ष) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो पद्मा नगर – भिवंडी येथील रहिवासी आहे. यंत्रमाग कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत असताना लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. त्यामुळे आर्थिक टंचाईतून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःच्या व्हॅगन आर कारला ओलामध्ये लावून घेतलं. स्वतःच ड्रायव्हर म्हणून त्याने मागील एक महिन्यापासून काम करण्यास सुरुवात केली होती.

▶️हत्येचं कारण अस्पष्ट
चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करत नारपोली पोलिसांनी अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या नेमकी कोणी केली, हत्येचं कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

8 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

9 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

19 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

19 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago