महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२६ मे) : रुग्णांच्या न्याय – हक्क अधिकार आणि मोफत उपचारासाठी लढणारी आशिया खंडातील पहिली संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषदेला अल्पावधीत लोकप्रियता प्राप्त झाली. लोकांचे प्रश्न, सामाजिक विषय आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून काम करत असताना राज्य कमिटीतील प्रलंबित असणारे फेरबदल आज संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, नवनिर्वाचित सर्वच पदाधिकारी संघटनेशी निःस्वार्थी वृत्तीने एकनिष्ठ राहिले असून गेल्या चार वर्षात स्थापने पासून तळागाळातील लोकांना उत्तम आरोग्य – उपचार मिळावेत म्हणून सभा, मेळावे आणि आंदोलने केली आहेत. यातील सर्वच पदाधिकारी अनुभवी असून राज्यातील अनेक प्रश्नांची सर्वांना जाण आहे.
रुग्ण हक्क परिषदेची महाराष्ट्र प्रदेश कमिटी – श्री. दीपक पवार- जनरल सेक्रेटरी, श्री. चंद्रकांत सरवदे -प्रदेश उपाध्यक्ष, डॉ. सलीम आळतेकर- संपर्कप्रमुख, श्री. संजय जोशी- केंद्रीय कार्यालय प्रमुख, श्री. शैलेश खुंटये- प्रसिद्धीप्रमुख, डी. डी. पाटील – उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, गिरीष घाग- संघटक आणि सारिका नागरे – कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश या पदाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. पुणे, सोलापूर, नाशिक जिल्हा कमिटीचा कार्यभार कायम ठेवला असून इतर सर्वच बरखास्त झालेल्या जिल्ह्यांची नवी कार्यकारिणी गठीत करण्याचे काम नवनिर्वाचित पदाधिकारी करणार आहेत.
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…