Categories: Editor Choice

नवी सांगवीत अवतरली साक्षात ‘महालक्ष्मी’ … शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या विविध रूपाचे दर्शन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ऑक्टोबर) : शारदीय नवरात्रौत्सव सुरक्षित वावराचे नियमाचे पालन करून साजरा करण्याच्या सूचना प्रशानसाने दिल्या आहेत . करोना अद्याप नियंत्रणात आला नसल्याने नवरात्रात मंदिरे उघडली असली तरी काही बंधने राहणार आहेत . सांस्कृतिक , सामाजिक कार्यक्रम होणार नाहीत . त्यामुळे भाविकांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करावा , असे आवाहन विविध मंदिर प्रमुखांनी केले .

गुरूवारी (दि.०७ ऑक्टोबर) ब्रह्म मुहूर्तावर घटस्थापना करून नवरात्र उत्सवास भाविकांच्या अनुपस्थितीत यंदा प्रारंभ झाला आहे. विविध धार्मिक कार्यक्रमाने घटस्थापना होत असते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

औधोगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडच्या सौदर्यात भर घालणाऱ्या नवी सांगवीतील महालक्ष्मी मंदिराचे शिल्पसौंदर्य काही अप्रतिमच आहे . मंदिराच्या गाभाऱ्याची रचना अगदी सुरेख आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज आहे, वरच्या एका हातात गदा आहे , एका हातात ढाल आहे . खालच्या उजव्या हातात मातुलिंग , तर डाव्या हातात पानपात्र आहे . देवीच्या मुकुटावर शिवलिंग आहे . त्यावर नागफणा आहे . देवीचे वाहन सिंह आहे . कपाळी हळदी कुंकवाचा मळवट भरलेला आहे . नाकात नथ आहे. अंगावर भरजरी पैठणी आहे . देवीचे हे वैभवशाली रूप आदिशक्ती सगुण साकाराचे दर्शन घडविते. त्यामुळे साक्षात कोल्हापूर ला येऊन ‘अंबा’ मातेचे दर्शन घेतल्याचे समाधान लाभते, असे येथे येणारे भाविक सांगतात.

शुभायास्तु महालक्ष्मीर्भवतां भवतारिणी । बिभ्रती शिरसा लिंगमशेषा घौघहारिणी ।।

“ महालक्ष्मीची नित्योपासना पहाटे पाच वाजता सुरू होते . रात्री अकरा वाजता शेजारती होते. देवीच्या चरणांवर दुग्धाभिषेक केला जातो आणि नित्योपासना सुरू होते . दुग्धाभिषेकानंतर गंध , पुष्प व वस्त्रादी उपचारांनी देवीची पूजा केली जाते . काकडा आणि कापूर लावून देवीला ओवाळले जाते , ही आरती सकाळी ७ .३० वा. आणि सायंकाळी ७ .०० वाजता केली जाते. दुपारी १२ वाजता महानैवेद्य दाखवला जातो ,रात्री निद्रा आरतीच्या अगोदर लोणी आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर निद्राआरती करून देवीला झोपविले जाते. यावेळी आरती दरम्यान भक्त मंदिराबाहेरुन देवीचे दर्शन घेत असताना दिसले. कोरोनाच्या काळात अशीच काळजी भक्तांनी घ्यावी हीच अपेक्षा …

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

5 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

5 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago