महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ ऑगस्ट) : आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस आहे. चंद्रयान 3 चंद्रापासून हाकेच्या अंतरावर असतानाच 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकेल अशी अपेक्षा सर्व भारतीयांना होती आणि ती यशस्वी झाली 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित झालेलं चंद्रयान – 3 चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत होते.
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी आणि भारताच्या शास्त्रज्ञांना यश मिळो या साठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडून मंदिरात पहाटे महाअभिषेक केला गेला. अभिषेकला दूध, दही, फळे, सुकेमेवे फळांचा रस वापरण्यात आला.
आज भारतासाठी मोठा दिवस असून भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. त्याच्या सुरक्षित लँडिंगसाठी गणपतीला अभिषेक करण्यात आला. या वेळी गणपतीच्या मुकुटावर चंद्रकोर लावले होते. मोहीम यशस्वी होण्यासाठी बाप्पाला प्रार्थना केली. आज संध्याकाळी ठीक 6:04 वाजता, जग त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला, जेव्हा विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले, एखादा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्याचा मान भारताला मिळाला. या ऐतिहासिक क्षणासह भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश बनला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…