Lonavala : दुचाकीस्वाराला मारहाण करुन जबरी चोरी करणारे २४ तासाच्या आत गजाआड … लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला अडवून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच त्या व्यक्तीकडील दुचाकी, सोन्याची चेन आणि रोख रक्कम असा एकूण पावणे दोन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली होती. ही घटना लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतवण गावाजवळील घुबड तलाव ते लोणावळा रोडवर सोमवारी (दि.18) रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींना 24 तासाच्या आत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सनी सुरेश मराठे, रोशन कैलास वाकोडे, गोविंद काशिनाथ हिरवे, संतोष शंकर आखाडे, कल्पेश ज्ञानेश्वर मराठे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हमिदुल्ला नसीबउल्ला खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमिदुल्ला हे त्यांची यामाहा कंपनीच्या दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यांना दमबाजी व मारहाण करुन त्यांच्या ताब्यातील दुचाकी, गळ्यातील चेन आणि 14 हजार 700 रोख रुपये असा एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

हमिदुल्ला यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पथक तयार करुन आरोपींचा शोध घेतला. आरोपींचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपींची नावे पोलिसांना मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून यामाहा कंपनीची दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे.

ही कारवाई लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत, पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार युवराज बनसोडे, पोलीस नाईक मयूर अबनावे, रफिक शेख, पोलिस शिपाई रईस मुलाणी, हनुमंत शिंदे, होम गार्ड शुभम कराळे, पोलीस मित्र योगेश हांडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे हे करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago