Google Ad
Uncategorized

दिवसात फक्त एक तास व्ययाम करुया .., आपलं ह्रदय नेहमी सुरक्षित ठेऊया..! या संकल्पनेतून गोल्डन सायकलिस्ट ग्रुप आळंदीतून आरोग्य जनजागृती मोहिमेची होणार सुरुवात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ ऑक्टोबर) : नवरात्रोत्सव आरोग्य जनजागृती सायकल मोहिम क्षेत्र आळंदी ते क्षेत्र तूळजापूर. – दिवसात फक्त एक तास व्ययाम करुया .., आपलं ह्रदय नेहमी सुरक्षित ठेऊया..! या संकल्पनेतून गोल्डन सायकलिस्ट ग्रुप आळंदीतून दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५ वाजता आरोग्य जनजागृती मोहिमेची सुरुवात करणार आहे.

आज काल शहरामध्ये तरुणमुलांचे ह्दयविकाराच्या तिव्र झटकाचे अर्थात attack चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .त्याचे कारणही तसेच आहे .आजच्या धावपळीच्या व चढा ओढीच्या जीवनात आणि त्याहून मोबाईलवरील सोशल मिडीया कॅमेट , लाईक आणि फाॅलोओरस वाढवण्यातच अनेक तरुण मुले बरासा वेळ घालवताना दिसतात.

Google Ad

*मोबाईलवर फाॅलोओरस वाढवण्यापेक्षा एक तास व्ययाम करुन आयुष्य वाढवा ..!*

या सर्व गोष्टींमुळे तरुण मुले जेवनाचा आहार आणि वेळवरची झोप विसरले आहेत .या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून दिवसभरातला एक तास तरी आपल्या शरिराच्या व्ययामासाठी दिला पाहिजे . तरच आपले शरिर सुदरुड आणि निरोगी राहिल.

पुणे , इंदापूर , कुरकुंभ , सोलापूर , तुळजापूर आदि प्रमुख शहरांमध्ये आरोग्य जनजागृती करुन 320 कि.मी.अंतर पूर्ण करणार आहेत.आळंदी ते तुळजापूर आरोग्य जनजागृती मोहिमेमध्ये सायकलपटू दत्ता घुले , जितेंद्र मिश्रा , मधूकर मोरे , आजित महाबरे , योगेश मुंगसे , वैभव पाटिल , विनायक तार्वे , दिलीप येलपले , चिंतामणी मांडगुळकर
सहभागी होणार आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!