Latur : अल्फा हॉस्पिटलचे डॉ दिनेश वर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला!

महाराष्ट्र 14 न्यूज : करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा या लातूर शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर दिनेश वर्मा यांच्यावर बुधवारी सकाळी सात वाजता प्राणघातक हल्ला झाला . सुदैवाने डॉक्टरांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे . त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर पी.बी. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे . उदगीर शहरातील एका ७५ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी अल्फा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .

रुग्णालयात दाखल करताना त्यांची प्रकृती चिंताजनक होती . नातेवाईकांच्या आग्रहाखातर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले . मागील दोन दिवस त्यांच्या प्रकृती बद्दल नातेवाईकांना डॉक्टरांनी कल्पना दिली होती , त्यांना मधुमेह होता व ऑक्सिजन पुरवठाही शरीरात कमी होता . दरम्यान बुधवारी पहाटे सव्वा पाच वाजेच्या दरम्यान त्यांचे निधन झाले . डॉक्टर दिनेश वर्मा हे रात्री दोन वाजेपर्यंत रुग्णालयात होते , पहाटे पुन्हा त्यांनी पाचनंतर रुग्णालयात रुग्णाची पाहणी सुरू केली होती .

दरम्यान , सकाळी सात वाजेच्या दरम्यान तिस – या मजल्यावर सहा – सात लोक उभे असलेली त्यांना दिसली . त्यापैकी तिघांच्या तोंडाला मास्क नव्हता , यामुळे डॉक्टरांनी त्यांना हटकले व त्यातील एकाने माझ्या आईचे निधन झालेले आहे आणि मी नाराज असल्याचे सांगत तो त्यांना वाटेल ते बोलू लागला . यावर डॉक्टरांनी त्यांना तुम्ही तोंडाला मास्क लावून या , आपण बोलू असे सांगितले . त्यानंतर या लोकांनी डॉक्टरवर हल्ला केला .

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

7 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

7 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago