क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “ पिंपरी चिंचवड शहरात “महिला शिक्षक दिन ” म्हणून विविध उपक्रमाद्वारे साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि .०३ जानेवारी २०२१ ) : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या , थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान अतिशय मोलाचे असुन सावित्रीबाई यांनी शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली त्यामुळे आजची स्त्री पंतप्रधान , राष्ट्रपती , महापौर पदी विराजमान होवू शकली , असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला शिक्षण दिनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . पिंपरी चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले . त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ” मी सावित्रीबाई बोलते ” या एकपात्री प्रयोगाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले . त्यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी आमदार महेश लांडगे , उपमहापौर केशव घोळवे , स्थायी समिती सभापती संतोष लोंडे , अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर , नगरसदस्य सुरेश भोईर , नगरसदस्या माधबी राजापुरे , सुवर्णा बुरुडे , आश्विनी जाधव , माजी नगरसदस्य मारुती भापकर , सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे , भाई विशाल जाधव उपस्थित होते .

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे , स्थायी समिती सभापती संतोष लोंडे , आयुक्त श्रावण हर्डीकर , अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर , नगरसदस्य सुरेश भोईर , नगरसदस्या माधवी राजापुरे , सुवर्णा बुरुडे , आश्विनी जाधव , माजी नगरसदस्य मारुती भापकर , सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे , भाई विशाल जाधव , संतोष गोतावळे , शंकर लोढे , महावीर जाधव आदी उपस्थित होते .

पिंपरी चौक येथील महात्मा ज्योतीराव फुले पुतळा परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . त्यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे , उपमहापौर केशव घोळवे , स्थायी समिती सभापती संतोष लोढे , आयुक्त श्रावण हर्डीकर , प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर , प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर , माजी महापौर अपर्णा डोके , नगरसदस्या माधवी राजापुरे , सुवर्णा बुरुडे , आश्विनी जाधव , माजी नगरसदस्य मारुती भापकर , माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे , अइ . उर्मिला काळभोर , सुरेखा बुगडे , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे , प्रतापराव गुरव

अरुण बकाल , आनंदा बुदळे , भाई विशाल जाधव , देवेंद्र तायडे , गणेश वायुंजकर , गिरिश वाघमारे , नेहुल कुदळे , संतोष जोगदंड , हनुमत घुगे , विलास गव्हाणे , हनमंत माळी , वैजनाथ शिरसाठ , काळुराम गायकवाड , अनिल माळुखे , मारुती कदम , बैजनाथ माळी , संतोष जाधव , अशोक लोले , अमोल पल्हाडे , गुलाब पानपाटील , भारतराज मोरे , सामाजिक कार्यकर्त्या अॅड . विद्या शिंदे , बदना जाधव , सोनाली कुदळे , वर्षा जगताप , डॉ . वर्षा कुदळे , डॉ . ऐश्वर्या कुदळे , कविता महराडे , पुजा वायचळ , सविता खराडे , नंदा करे , वैशाली राऊत , सुनिता जमदाटे , मीरा कुदळे आदी उपस्थित होते .

मोशी येथील महानगरपालिकेच्या शाळेतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास महापौर माई डोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी उपमहापौर केशव घोळवे , माजी आमदार विलास लांडे , नगरसदस्या माधवी राजापुरे . सुवर्णा बुरुडे , आश्विनी जाधव , माजी उपमहापौर शरद बोराडे , माजी नगरसदस्य धनंजय आल्हाट , अरुण बोराडे , दिलीप बोराडे , मुख्याध्यापक विठ्ठल मुंडे आदी उपस्थित होते .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात शारदाताई मुंडे यांनी ” भी सावित्रीबाई बोलते ” हा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा – या महिलांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . त्यामध्ये रेश्मा गायकवाड , रंजना धुमाळ , अॅड . प्रिती पंडीत , शनिता पवार , पिनल वानखेडे , डॉ . माधुरी शिंगाडे , अर्चना सावत्त , सोनाली कुदळे , कविता जगताप , मुनिता इमकाडे , शिप्रा नानजकर , मिनाक्षी राळे यांचा समावेश आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले . प्रास्ताविक भाई विशाल जाधव यांनी तर गिरिष वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

शासनाने , स्त्रीयांच्या मुक्तीवाल्या असणा – या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची असून त्यांचे शिक्षणातील योगदान , त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचविणे व त्यांनी बनविलेले शैक्षणिक मुल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे, हे ओळखून सावित्रीबाई फुले यांची जयंती निबंध लेखन , एकांकिका अशा विविध उपक्रमाद्वारे ” महिला शिक्षण दिन ” म्हणून साजरा करणेबाबत निर्देश दिलेले आहेत .

त्यानुसार महानगरपालिकेने उपक्रम राबविलेले आहेत . क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित रांगोळी चित्रे महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये विजय शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारली आहेत . या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती , आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , सावित्रीबाई फुले महिला यासपीठ , ओबीसी संपर्ण समिती , ओबीसी संपर्ण सेना , महाराष्ट्र परिट सेवा मंडळ , पिंपरी चिंचवड शहर लाँड्री संघटना , सम्यक विद्यार्थी आंदोलन , नागरी हक्क सुरक्षा समिती यांनी देखील कार्यक्रम यशस्विततेसाठी प्रयत्न केले .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago