Categories: Editor Choice

किरीट सोमय्यांच्या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४मार्च) : श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात एक नाव समोर आलं होतं आणि ते म्हणजे पुष्पक ग्रुपचं. हा पुष्पक ग्रुप महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि कुटुंबीयांच्या मालकीचा आहे.

यापैकीच एक असलेल्या चंद्रकांत पटेल यांच्यासोबतचा उद्धव ठाकरेंचा एक फोटो भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे.

श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात चंद्रकांत पटेल यांचं नाव समोर आलं होतं. आता याच चंद्रकांत पटेल यांच्या सोबतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो किरीट सोमय्यांनी ट्विट केला आहे.

हा फोटो कधीचा आहे हे माहिती नाहीये आणि याची सत्यता आम्ही पडताळलेली नाहीये. मात्र, श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणात ज्या चंद्रकांत पटेल यांचं नाव समोर आलं होतं. त्या चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो किरीट सोमय्यांनी ट्विट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

किरीट सोमय्यांनी दावा केला आहे की, चंद्रकांत पटेल आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत. चंद्रकांत पटेल हे सीए असल्याचं सांगितलं जात आहे.

काही राजकीय नेत्यांचे आर्थिक व्यवहारही ते सांभाळत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पटेल एकत्र असल्याचा फोटो किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

23 mins ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

36 mins ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago