Categories: Uncategorized

वाकडचे कलाटे आणि वाकडकर कुटुंबिय कमळासोबतच; विजय जगताप यांनी घरोघरी साधला संवाद

वाकडचे कलाटे आणि वाकडकर कुटुंबिय कमळासोबतच; विजय जगताप यांनी घरोघरी साधला संवाद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ फेब्रुवारी) – भाजप आणि महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू विजय जगताप यांनी रविवारी वाकड परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. या भागात राहणाऱ्या कलाटे आणि वाकडकर कुटुंबांसह येथील सर्व जनता लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच वाकडची जनता कमळाच्या चिन्हावर मतदान करून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखांच्या मताधिक्याने विजयी करणार असा विश्वास व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती व प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. संपूर्ण जगताप कुटुंब सुद्धा प्रचारात उतरले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू विजय जगताप यांनी रविवारी वाकड भागात घरोघरी नागरिकांशी संवाद साधला. या भागातील सर्व नागरिकांना भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारपत्रकाचे वाटप केले.

यावेळी भाजपचे चिंचवड विधानसा प्रभारी संतोष कलाटे, विशाल कलाटे, राम वाकडकर, भारती विनोदे, अमर भूमकर, गणेश आल्हाट, श्रीनिवास कलाटे, अमोल कलाटे, विक्रम कलाटे, प्रदीप कलाटे, संजय भुजबळ, राजेंद्र विनोदे, कुणाल वाव्हळकर, बजरंग कलाटे, कालिदास कलाटे, सुदेश राजे, दिलीप भूमकर, संतोष बिनगुडे, नितीन केमसे, प्रमोद भुजबळ, सुरज भुजबळ, सन्नी भुजबळ आदी उपस्थित होते.

त्यांच्या या प्रचारात वाकड भागातील कलाटे आणि वाकडकर कुटुंबांनी साथ दिली. वाकडच्या विकासात दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचाच मोठा वाटा आहे. अन्य कोणी कितीही बढाया मारल्या तरी लक्ष्मणभाऊ जगताप यांनीच वाकडचा कायापालट केला. आज या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे येथील कलाटे आणि वाकडकर कुटुंबांसह येथील सर्व जनता पोटनिवडणुकीत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. वाकडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

1 day ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 week ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

3 weeks ago