Categories: Editor Choice

जम्बो कोविड सेंटर नेहरू नगर येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक, आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे न्याय्य देण्याची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ सप्टेंबर) : नेहरू नगर येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी महामानव एक्सप्रेस असंघटीत कामगार संघटना अध्यक्ष गिरीश साबळे व संघटनेतील सभासद कर्मचार्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. यावेळी आपल्या समस्यां आमदारांसमोर मांडल्या. व न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

महामानव एक्सप्रेस असंघटीत कामगार संघटनेचे सभासद हाऊस किपींग, वार्ड बॉय, वॉर्ड मावशी, रुग्न काळजी घेणे, अशा विविध पदावर रुजू होते. मात्र कोणतीही पूर्वकल्पना ना देता त्यांना १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता कामावरून कमी केल्याचा मेसेज आला, कोणतीही कायदेशीर नोटीस ना देता कामगारांना कामावरून कमी करण्यात आले.  कोविडच्या अत्यंत कठीण काळात स्वतःची व आपल्या कुटुंबाची पर्वा ना करता या कर्मचाऱ्यांनी रूग्णांची  मनोभावे सेवा केली .

तसेच कामावर रुजू होतांना जे वेतन ठरले होते ते ना देता प्रत्यक्षात कामगारांना कमी वेतन देण्यात आले, पी. एफच्या नावाखाली वेतनात कपात करण्यात आली, असे कामगारांचे म्हणणे होते. ठेकेदाराने आमची फसवणूक केली असून, या बाबतीत सखोल चौकशी  करण्यात यावी, व कामगारांना न्याय मिळावा, अशी मागणी आमदार बनसोडे यांना यावेळी करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष व कामगारांचे व्यथा ऐकून घेतल्यावर आमदार बनसोडे यांनी त्यांना लवकरात लवकर पालिका प्रशासनासोबत बोलून विषय निकाली काढू, तसेच ज्या कामगारांना तात्काळ कामावरून काढले आहे, त्यांना इतर ठिकाणी तातडीने भरती करून घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार बनसोडे यांनी दिले .

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

11 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago