महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) : राज्यभरात गेले चार दिवस चैतन्याच्या वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवात घरगुती गौरी-गणपतीचे आज उत्सवात स्वागत केले. यंदा मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींचा सण पार पडला. गुरुवारी २१ सप्टेंबरला पहिल्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातही जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात आले. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात.
नवी सांगवी समता नगर मधील सौ. जयश्री पाटील यांनी गौरी सजावटीसाठी भारताने चंद्रावर पाठविलेले चांद्रयान मोहीम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘चांद्रयान-३’ हा देखावा सादर केला असून यामध्ये चंद्रावर जाण्यासाठी इस्रोने वापरलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या भारताचे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान आणि छायाचित्रे मांडण्यात आली असून हे सर्वच डोळे दिपवून टाकणारे दृश्य नवी सांगवीकरांचे लक्ष वेधून घेत होते, ते पाहण्यासाठी अनेक महिलांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते.
गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावटही करण्यात येते. कोणी फुलांची आरास करतात. तर कोणी दिवे आणि थर्माकॉलच्या मखरात गौरीला बसवतात. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. हे तर सगळेच करतात, परंतु जयश्री पाटील यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत होते.
यावेळी बोलताना ‘जयश्री कृष्णा पाटील‘ म्हणाल्या, यावर्षी भारताने चांद्रयान मोहीम यशस्वी केली, देशभर हा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला, आपणही काहीतरी वेगळे करावे असे वाटले, आणि ही संकल्पना सुचली, मला या कामात माझा मुलगा तेजस चे खूपच सहकार्य मिळाले आणि आम्ही सर्व कुटुंबाने हा देखावा बनवला याचा खूप आनंद होतो आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…