महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ नोव्हेंबर) : मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी या मागणीला विरोध केला आहे. मात्र, मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनच राष्ट्रवादीतच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.
आम्ही भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नसून राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजेत, अशी भूमिका पक्षाचे उपाध्यक्ष उदय आहेर यांनी मांडली आहे. तसंच हीच पक्षाची भूमिका असल्याचंही पक्षाध्यक्ष अजित पवारांनी अधिकृतपणे जाहिर करावी, अशी विनंती आम्ही अजितदादांकडे करणार असल्याचंही आहेर म्हणालेत. आज पुण्यात राष्ट्रवादीतील कुणबी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सरकारने जरांगे यांना दिलेलं आश्वासन हीच पक्षाची भूमिका असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भुजबळ जे भूमिका मांडताहेत ती त्यांची व्यक्तिगत भूमिका असल्याचा सूरही या बैठकीत लावला गेला.
अंबड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, “मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा जरांगेंना भुजबळांनी टोला लगावला आहे. आमची सुद्धा लेकरं आहे, तुम्ही वेगळ आरक्षण घ्या, असे भुजबळ म्हणाले.
जरांगे पाटील म्हणाले, की या एल्गारासाठी तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली, कशाचा आधार घेऊन गेली ते सांगा, ज्यांना ज्यांना आरक्षण कळालं तेच आरक्षणात गेले, आपल्याला आरक्षण कळायला 70 वर्षे गेले. जेव्हा कळालं तेव्हा मराठ्यांची त्सुनामी झाली. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा आवाहन करतो, तुम्हाला आरक्षण असलं तरी नसलेल्या भावासाठी मैदानात या. आपली जात संपवण्यासाठी चारी बाजूने वेढा टाकायचं ठरवलं आहे. आपल्याला एकत्र लढून हा वेढा तोडायचा आहे, मी लेकरू म्हणून तुम्हाला सांगतोय माझ्या समाजाकडे लक्ष द्या.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…
महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५ :* जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव…