Jalgaon : राष्ट्रवादीच्या संवादयात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल … एकनाथ खडसे

महाराष्ट्र 14 न्यूज : विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील आपल्या विस्तारासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा‘ सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवा ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ही यात्रा आता खान्देशात पोहोचणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या संवादयात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं काम सुरु आहे. विदर्भाचा दौरा आटपून ही यात्रा खान्देशात येत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 11 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला संवाद यात्रा येणार आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेत.

राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेचं 11 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन होईल. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद तर साधलाच जाणार आहे पण अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही छोटेखानी सभांचं आयोजन केलं गेलं आहे. या यात्रेने कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण होईल, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago