ब्रेकिंग न्यूज – Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याजवळ मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात … अपघातात 15 मजूर ठार!

महाराष्ट्र 14 न्यूज : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याजवळ मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 मजूर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी असून तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावलजवळ असलेल्या किनगाव इथं आज पहाटे पपईने भरलेल्या ट्रक उलटल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 15 मजूर ठार झाले आहे. धक्कादायक म्हणजे, यात एकाच कुटुंबातील 10 सदस्यांचा समावेश आहे. धुळ्यातून MH-Z-3568 हा आयशर ट्रक पपई घेऊन हा रावेरला चालला होता.

यावल जवळील किनगाव इथं पोहोचला असता अचानक चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. या ट्रकमध्ये पपई मोठ्या प्रमाणात भरलेली होती. ट्रक उलटल्यामुळे मागे बसलेले मजूर हे पपईच्या ढिगाराखाली सापडले असल्याची माहिती मिळत आहे. सर्व मजूर हे झोपलेले होते, त्यामुळे काही कळण्याच्या आता काळाने त्यांच्यावर झडप घातली.

या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, यात एकाच कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना तातडीने यावल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नेमका हा अपघात का आणि कशामुळे घडला याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago