महिलांचे गळयातील मंगळसूत्र हिसकावणा – या दोन सराईत इराणी आरोपीना अटक … १२,६५,००० / -रु . किंमतीचा मुद्देमाल हस्तगत … १७ गुन्हेही उघडकीस!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरामध्ये चेन चोरी व वाहन चोरी घडत असल्याने मा.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चोरीचे घटनांचा आढावा घेवुन , गुन्हे शाखेकडील आधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करुन , गुन्हे उघडकीस आणणेबाबत दिलेल्या आदेशा प्रमाणे , खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी पोलीस उप – निरीक्षक महेंद्र पाटील व शाकीर जिनेडी यांची ०२ पथके तयार करुन , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयातील उघडकीस न आलेले चेन स्नॅचिंग गुन्हयांचा आढावा घेवुन , रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली.

ही माहिती घेत असताना , पोलीस अंमलदार आशिक बोटके , निशांत काळे व प्रदीप गोडांबे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , चेन चोरी करणारे दोन इसम एका काळ्या रंगाचे नंबर नसलेल्या आपाची मोटार सायकलवरुन देहुफाटया कडुन मोशीचे दिशेने येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने , डुडुळगाव येथे सापळा रचुन सफिर फिरोज खान वय -३५ वर्षे रा . दत्तवाडी , सिंहगड कॉलेजरोड , लोणावळा पुणे २ ) मोहम्मद उर्फ डॉन शाबुद्दीन इराणी वय २५ वर्षे रा . म.गांधी झोप.शिवाजीनगर , पुणे यांना काळया रंगाचे आपाची मोटार सायकलसह ताब्यात घेवुन , चौकशी करुन , त्यांना वाकड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर ३५/२०२१ भादवि कलम ३ ९ २ , ३४ या गुन्हयाचे कामी दिनांक ०५/०२/२०२१ रोजी १ ९ : १५ वा.अटक करुन त्यांची पोलीस कोठडीची रिमांड घेण्यात आली .

पोलीस तपासामध्ये दोन्ही आरोपी व त्यांचा साथीदार पाहिजे आरोपी मोहसीन लालु जाफरी रा.रायसेन मध्यप्रदेश हे चोरलेल्या वाहनांचा महिलांचे गळयातील चेन स्नॅचिंग गुन्हया करीता वापर करीत होते . त्यांचकडुन चेन स्नॅचिंग गुन्हयातील ११,०००,०० / -रु . किंमतीचे २२० ग्रॅम सोन्याचे दागिने व १,६५,००० / -रु . किंमतीचे २ दुचाकी वाहने असा एकुण १२,६५,००० / -रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन , त्यामध्ये वाकड , सांगवी व देहुरोड पोलीस स्टेशन कडील प्रत्येकी -०३ , चिंचवड पो.स्टे . कडील ०२ , चिखली , एमआयडीसी भोसरी , दिघी , तळेगाव दाभाडे , चाकण तसेच गंगाखेड ( परभणी ) पोलीस स्टेशन कडील प्रत्येकी – ०१ असे चेन चोरीचे १४ गुन्हे , पोलीस बतावणी ०१ गुन्हा व वाहन चोरीचे ०२ गुन्हे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत .

आरोपी सफिर फिरोज खान हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द पुणे शहर , पुणे ग्रामीण येथे दरोडा व जबरी चोरीचे २२ गुन्हे दाखल आहेत . तसेच आरोपी मोहम्मद उर्फ डॉन शाबुद्दीन इराणी याचे विरुध्द पुणे शहर , पुणे ग्रामीण येथे जबरी चोरी व वाहन चोरीचे ० ९ गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त श्री . सुधीर हिरेमठ , सहा.पोलीस आयुक्त , श्रीमती प्रेरणा कट्टे , यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ , पोलीस उप- निरीक्षक महेंद्र पाटील व शाकीर जिनेडी तसेच पोलीस अंमलदार अशोक दुधवणे , गणेश हजारे , निशांत काळे , आशिष बोटके , प्रदीप गोडांबे , किरण काटकर , सुधीर डोळस , सुनिल कानगुडे , शकुर तांबोळी , गणेश गिरीगोसावी , विजय नलगे , संदीप पाटील , शैलेश मगर , आशोक गारगोटे , प्रदीप गुट्टे , तांत्रिक विश्लेषण विभागातील राजेंद्र शेट्टे , नागेश माळी व वाकड पोलीस स्टेशनचे जावेद पठाण यांचे पथकाने केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago