विसरू नका या घडीला …..येताय ना इंद्रायणी थडीला !
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जानेवारी) : सन्मान नारीशक्तीचा… अभिमान भारतीय संस्कृतीचा… महाराष्ट्राची लोककला आणि पाककला जपणारी आपली “इंद्रायणी थडी” दि. २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ ‘ गावजत्रा मैदान, भोसरी येथे आमदार महेशदादा लांडगेयांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंच आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दि.२५ जानेवारी रोजी सायंकाळी ०६ वा. करण्यात येणार आहे
भोसरी येथील गावजत्रा मैदानावर सुमारे १७ एकर जागेत हा महोत्सव होणार असून, एक हजारहून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. शेकडो महिला बचतगट, महिला संस्था, स्वयंसेवी संस्थांचा या जत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरण आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाला आवर्जुन भेट द्यावी आणि विविध कार्यक्रम, उपक्रम आणि उत्पादने खरेदीचा आनंद लुटावा. त्याद्वारे महिला सक्षमीकरण उपक्रमाला निश्चितपणे प्रोत्साहन मिळणार आहे.
यात असणार :-
– अभिनेता पुष्कर श्रोत्री प्रस्तूत होम मिनिस्टर. सहभागी महिलांना मिळणार आकर्षक बक्षीस
– ग्राम संस्कृतीसह ५० हून अधिक विविध मनोरंजनाचे कार्यक्रम
• मोफत बालजत्रा –
– भव्य श्रीराम मंदिर
– जॉब फेअर
• शिवकालीन शस्त्र प्रदर्शन –
नवीन मराठी चित्रपट ‘बांबू’ या चित्रपटाची टीम येतेय प्रेक्षकांच्या भेटीला…
भव्य – दिव्य प्रभू श्रीराम मंदिर आणि १००० स्टॉल बांधणीचे काम आज संपूर्ण झाली असून, उद्या २५ जानेवारी रोजी होणार या जय्यत महोत्सवाचे उद्घाटन. आपण आपल्या सहपरिवरासोबत नक्की या महोत्सवात सहभागी व्हावे व या जत्रेचा आनंद घ्यावा असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
इंद्रायणी थडी महोत्सवामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.