Google Ad
Editor Choice

या निवडणुकीत भाऊंचा प्रभाव भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम त्यामुळे आम्हाला वाटतं ही निवडणूक सहज सोपी होईल : आमदार महेशदादा लांडगे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जानेवारी) : भाजपचे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ०३ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले, आणि नुकतीच त्या ठिकाणी पोटनिवडणुक लागली, तसे शहरात निवडणूक विषयक वातावरण तापू लागले. यात पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश दादा लांडगे यांची भूमिका खूपच महत्त्वाची मानली जाते. एका वृत्तवाहिणीसमोर बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले…

यावेळी येणारी पोटनिवडणुक याविषयावर बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले , या ठिकाणी निवडणूक होईल न होईल या फक्त चर्चा आहेत. ही निवडणूक आहे ती लक्षणभाऊ यांचा प्रभाव असलेल्या भागात ती होत आहे, आणि लक्ष्मण जगताप हे फक्त चिंचवड पुरते मर्यादित न्हवते तर ते जिह्याच्या राजकारणात प्रभाव असणारी व्यक्ती होती. लक्ष्मण भाऊंनी प्रचार यंत्रणेत आपल्या पक्ष श्रेष्ठी समोर बाजू मांडताना अगदी प्रामाणिक पणे मांडली. तसेच शहराचा विकास करताना सर्व पक्षातील नेतेमंडळीना बरोबर घेऊन त्यांनी या शहराचा सर्वांगीण विकास केला. त्यामुळे या निवडणुकीत भाऊंचा प्रभाव भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम त्यामुळे आम्हाला वाटतं ही निवडणूक सहज सोपी होईल.

या निवडणुकीत विरोध करण्याबद्द्ल जी चर्चा आहे, तो ज्या त्या पक्षातील पक्षश्रेष्ठींनी ठरवायचा विषय आहे. परंतु आमच्या पक्षात भारतीय जनता पक्षात सर्व निर्णय ही एक संघटनात्मक प्रक्रिया आहे, त्यातून उमेदवारी किंवा निवडणूक होते, परंतु या निवडणुकीत पॉझिटिव्ह निकाल आमच्या बाजूने असेल.

Google Ad

भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असावा ही एक व्यक्ती ठरवत नाही,तर ही आमची एक संघटात्मक प्रक्रिया आहे, त्यात प्रदेशाध्यक्ष आहेत, देवेंद्र फडणवीस असे अनेक मंडळी असून चर्चा करून मग उमेदवारी जाहीर करण्यात येते.

जगताप परिवाराच्या उमेदवारी बद्दल महेश लांडगे म्हणाले, :

जगताप कुटुंब हे खूप आदर्श कुटुंब आहे , एकत्र कुटुंब पद्धतीत एका संस्कारात वाढलेला हा परिवार आहे. या परिवाराचे संस्कार आणि विचार खूप मोठे आहेत. त्या परिवारात सर्व भाऊ एकत्र राहून निर्णय घेतात, त्यामुळे चर्चा लोक काही करत राहतात, परंतु एका प्रभावशाली संस्काराने प्रेरीत झालेला हा परिवार आहे. त्यामुळे तसे काही नाही…

बिनविरोध निवडणूक होण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून आणि आमच्याकडून प्रयत्न होतील, त्याकरीता आमचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्या (दि.२५ जाने.) बैठक ठेवली त्यात निवडणूक यंत्रणेबाबत चर्चा होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!