Google Ad
Editor Choice

हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न … नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी

हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरलेल्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी

Google Ad

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जानेवारी) : भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्त शिल्प) द्वारा आणि सांगलीच्या चरक स्वास्थ्य बहुद्देशीय संस्थच्या वतीने आयोजित ‘क्राफ्ट बझार’ या हस्त कलेतून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रदर्शनातील विविध वस्तूंच्या स्टॉलला भेट देऊन खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.

नवी सांगवीतील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर हे प्रदर्शन भरले असून दिनांक 20 जानेवारी टे 29 जानेवारी 2023 असे दहा दिवस सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये प्रवेश विनामूल्य आहे. पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालयाचे (हस्त शिल्प) सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग, माजी नगरसेवक अनिकेत काटे, सौ. शीतल शीतोळे, चरक स्वास्थ्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किरण चव्हाण, सचिव बी.एएस , चव्हाण, प्रकल्प संचालक रमेश मनगेनी, सदस्य स्नेहलता चव्हाण, जेष्ठ नागरिक संघाचे जयवंतमामा मोरे, नृत्य कलाकार फिरोज मुजावर आदी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉलला भेट देऊन प्रदर्शनातील हस्तकलेपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंची माहिती घेतली.भारत सरकारच्या वस्त्रालय मंत्रालयाच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्त शिल्प) द्वारा एम.एस.एस. योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जातो. हस्तकला कारगिरांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या मागचा हेतु आहे.

बी. एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक रमेश मनमेनी यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नृत्य कलाकार फिरोज मुजावर यांनी सादर केलेल्या गणेश वंदनाने उपस्थितांची मने जिंकली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!