महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर) : अवघ्या जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने त्याचे औचित्य साधून आपल्या भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवावी व स्वच्छता दिन साजरा करावा असे आवाहन केंद्र व राज्य शासनाने केले होते त्या निमित्ताने पुणे शहरात अनेक ठिकाणी आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
पुणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अप्पा रेणूसे हे या निमित्ताने आज सकाळपासून कार्यक्रमांना उपस्थित होते, त्यांनी सकाळी शिवाजीनगर येथे सिम्बॉयसिस कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला तरुण मुलांचा या कार्यातील उत्साह वाखाणण्याजोगा होता ही कौतुकाची गोष्ट तसेच धनकवडी येथे नागरिकांच्या सहभागाने स्वच्छता कर्मचाऱ्यांंसमवेत धनकवडी परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अप्पा रेणूसे यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला.
योगायोगाने आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन असल्याने धनकवडी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला नगरसेवक विशाल तांबे व ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार यांच्यासमवेत अप्पा रेणूसे उपस्थित होते, यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाजीराव गायकवाड यांना त्यांच्या वतीने सन्मानित करून त्यांनी सर्व ज्येष्ठांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वादही घेतले.
यावेळी बोलताना ‘अप्पा रेणूसे‘ म्हणाले, महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता दिन उपक्रमाच्या निमित्ताने युवकांबरोबर संवाद साधण्याचे तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने वडीलधाऱ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले.