Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्केटींग खेळाडू दुर्गा मिरजकर, वेदमूर्ती विनायक रबडे आणि पीएचडी पदवी प्राप्त डॉ. प्रियंका साखरे यांचा आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ नोव्हेंबर २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्केटींग खेळाडू दुर्गा मिरजकर, वेदमूर्ती विनायक रबडे आणि पीएचडी पदवी प्राप्त डॉ. प्रियंका साखरे यांचा आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, सागर आंगोळकर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.

डॉ. प्रियंका राम साखरे यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था पवईमधून ऑरगॅनिक केमेस्ट्री या विषयात पी.एच.डी प्राप्त केली आहे. डॉ. साखरे यांच्या वतीने त्यांचे वडील राम साखरे यांनी सत्कार स्विकारला.

दुर्गा गणेश मिरजकर हिने स्पिड स्केटिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर ३ पदके तर विभाग स्तरावर ४ सुवर्ण पदक पटकाविले आहे. वेदमुर्ती विनायक शेखर रबडे यांनी वेदशास्त्रामध्ये षडंगवित घनपाठी ही पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या बाराव्या वर्षी ऋग्वेद दशग्रंथ घनपाठ हा एकच ध्यास धरून सलग १८ वर्षे त्यांनी अध्ययन केले आहे. त्यांच्यावतीने वडील चंद्रशेखर रबडे आणि आई हेमांगी रबडे यांनी सत्कार स्विकारला.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago