Categories: Uncategorized

पहाटे गाढ झोपेत कुटुंबावर काळाचा घाला, चिखलीत आगीत होरपळून चौघांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे गाढ झोपेत असताना एका कुटुंबावर काळाने घाला घातल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी (ता. 30 ऑगस्ट) पहाटे चिखलीत असणाऱ्या एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीने पहाटे काही वेळातच रौद्र रुप धारण केले. ज्यामुळे या आगीच्या भक्ष्यस्थानी दोन चिमुकल्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु या चौघांनाही या आगीत आपले प्राम गमवावे लागले. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील चिखली भागात सचिन हार्डवेअर नावाचे दुकान होते. या दुकानातच चौधरी कुटुंब वास्तव्यास होते. परंतु, आज पहाटे या दुकानाला आग लागली आणि या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय वर्ष 10) आणि भावेश चौधरी (वय वर्ष 15) असे या आगीत मृत पावलेल्यांची नावे आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आग लागलेल्या दुकानामध्ये ऑईल पेंट असल्याने या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याचे सांगण्यात आले आहे. या ऑईल पेंटमुळे बंद दुकानामध्ये वायू निर्माण झाला आणि ज्यामध्ये गुदमरून या चौघांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळ राजस्थानचे असलेले चौधरी कुटुंब हार्डवेअरचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत होते आणि याच दुकानाच्यावर असलेल्या माळ्यावर ते वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून सदर घटनेची माहिती अग्निशमन दलाल मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवून कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…

3 days ago

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…

4 days ago

माॅक ड्रील- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…

1 week ago

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…

2 weeks ago