Categories: Uncategorized

अटल महाआरोग्य शिबिरात दोन दिवसांत एकूण दीड लाख नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ … शिबिरात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ एक्स रे – सोनोग्राफी सारख्या महागड्या तपासण्या मोफत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जानेवारी) : ‘आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ माणूस गेल्याचे दु:ख लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांच्या प्रत्येक हितचिंतकाला झाले. त्यांची योगासने, दबंगगिरी आणि दातृत्व याच्या आठवणी कायम निघतात. लक्ष्मण जगताप यांनी कायम लोकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला. त्याच धर्तीवर भव्य अटल महाआरोग्य विनामूल्य शिबीर आयोजित करण्यात आले. लाखो लोकांना याचा फायदा होईल’, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी पाटील बोलत होते.

यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, भाजपाचे संदीप खर्डेकर, संजीवीनी पांड्ये, आरोग्य सेवाचे सहसंचालक राधाकिशन पवार, डॉ. सचिन देसाई, डॉ. लक्ष्मण गोफणे आदी मान्यवर उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, एखादा आजार झाल्यावर आपल्याला कळत नाही. मात्र, त्याने भयानक रुग्ण झाल्यानंतर आपण हतबल होतो. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशातील १० कोटी कुटुंबाना ५ लाखापर्यंतचा आभा कार्ड दिले आहे. वैद्यकीय सेवेचे पुण्य अनेक जन्माचे पुण्य देते, असे असेच सुरू ठेवा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी, तर मान्यवरांचे स्वागत आमदार अश्विनी जगताप यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले आणि आभार माजी महापौर माई ढोरे यांनी मानले.

आरोग्यसेवेचे हे व्रत असेच निरंतर सुरू रहावे : चित्रा वाघ

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की, कोविडने मानवाला आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यायला शिकवले. आरोग्याची तपासणी केली पाहिजे. सर्वांनाच रुग्णालयात जावून उपचार घेणे शक्य होत नाही. लाखो लोकांची सेवा अत्यंत अचूक केली जात आहेत. एपिलेप्सीसारखा आजार, स्तनांचा कर्करोग, मॅमोग्राफी, सर्व्हायकल कॅन्सरसारख्या खर्चिक आजारांवर मोफत उपचार होत आहेत. दिव्यांगानाही साहित्य दिले जात आहेत. आरोग्यसेवेचे हे व्रत असेच निरंतर सुरू रहावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर’ तपासणी मोफत…

महिलांसाठी ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची तपासणी करण्याची सुविधा असलेली ‘व्हॅन’ उपलब्ध केली आहे. त्याचा रिपोर्ट एका तासात मिळतो. पुण्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये ही व्हॅन फिरते. यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. त्यांची देखभाल दुरूस्तीची आम्ही करतो. आता यामध्ये सर्वप्रकारच्या तपासणी करण्याची सुविधा आहे. ही सुविधा पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू करण्याची घोषणा यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केली. त्याचे नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…

5 days ago

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…

6 days ago

माॅक ड्रील- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…

2 weeks ago

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…

3 weeks ago