Categories: Uncategorized

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीचा मेळावा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ जानेवारी) : राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या पुणे जिल्ह्याचा संयुक्त मेळावा आज डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन येथे आयोजित करण्यात आला होता.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, महेश लांडगे, राहुल कुल, उमा खापरे सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, चेतन तुपे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय भोसले व प्रमोद भानगिरे, रिपाइंचे शहराध्यक्ष परशुराम वाडेकर,शिवसेना जिल्हा निरीक्षक किशोर भोसले, उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि आर पी आय चे ऍड.मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केले

दीपक मानकर यांनी प्रास्ताविक केले. हा मेळावा लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या विजयाची नांदी आहे. एका विचाराने सर्व नेते एकत्र आले आहे.

त्यातून राज्याच्या विकासाला गती मिळत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने एकमेकांमध्ये समन्वयाचा प्रयत्न करण्यात आला. राम नामाच्या ताकदीमुळे काँग्रेसचे नेते घाबरले आहेत. काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना उमेदवार मिळतो की नाही अशी शंका आहे. महायुतीचा उमेदवार दहा लाख मते घेतल्याशिवाय आणि विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेच्या ४८ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जो उद्योग केला, त्यामुळे त्यांना सोसावा लागला. आमच्या निर्णयाची आम्ही वाट बघतो आहोत. तो निर्णयही अजित पवारांच्या बाजूने लागल्याशिवाय राहणार नाही. पुण्याचा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मताने निवडून आणायचा संकल्प करूयात.प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी मेळाव्याची भूमिका मांडली.

तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू, असे परशुराम वाडेकर म्हणाले.

त्यावर काही करून पदे द्या असे म्हणू नका, सबका साथ सबका विकास हे आपण ठरवले आहे, असे खासदार जावडेकर यांनी सांगितले. जावडेकर म्हणाले, तिसरी बार मोदी सरकार आणि इस बार चार सो पार हा संकल्प साकार करण्यासाठी राज्यात ४८ च्या ४८ जागा निवडून आणणार. बारामती २०१४ लाच पडत होते. थोडक्यात घोटाळा झाला. या वेळी लक्षात येईल. दोन वर्षे बसे मुख्यमंत्री पाहिले आहेत. तेलंगणात असेच मुख्यमंत्री होते. लोकांनी त्यांना घरी बसविले. काम करणारी सेना हवी आहे. राम प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमावर काँग्रेस बहिष्कार टाकत आहे. चांगल्या गोष्टीला काँग्रेसला या देशाचे सत्व कळले नाही. या देशातील जनता तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे. लोकसभा निवडणुकीला शंभर दिवस राहिले असून, सर्व पक्षांनी एकजीवाने काम केले पाहिजे. प्रत्येक घरी जाऊन आपले मत पोहोचवा. कामाचे वाटप नीट करून वेळापत्रक तयार करा. त्यासाठी पुण्यात पन्नास टक्के मतदान झाले होते. पुण्यात ७५ टक्के मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातून दहा लाखाच्या फरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, अजित पवार येणार होते. व्यग्र कार्यक्रमामुळे मला सांगण्यात आले. माझे कार्यस्थळ सातारा असले तरी जन्मस्थळ व शिक्षण स्थळ पुणे आहे. मोदीच्या कार्यशैलीमुळे आपण एकत्र आलो आहोत. 72 साली दुष्काळात मिलो खाणारा देश आता पाच ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था होत आहे, हे दुसऱ्या पक्षातून आलेल्याना हे आकर्षण आहे. राजकीय विचारधारा काही असली तरी मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल. राजकीय इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करायची ताकद इतर पक्षातील नेत्यांना भावत आहे.

महायुतीत येण्याचे भाग्य राष्ट्रवादीला मिळाले. उगाच काही न करणारे नेतृत्व आता नाही. एकमेकांविषयीची कटुता दूर करण्याचे संधी या मेळाव्यात आली आहे. पूर्वीच्या नेतृत्वाबद्दल काही बोलणार नाही, परंतु मोदिशिवाय पर्याय नाही. माझ्या नावातच राम आहे, परंतु इतके वर्ष वनवासात होतो. आता मोदींमुळे व्यवस्थित बाहेर आलो आहे.महायुती हाच आपला पक्ष झाला आहे ही भावना असली पाहिजे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास आपला विजय नक्की आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवत असलेल्या उपक्रमांची पाहणी…

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…

3 days ago

पुणे जिल्हा अथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने पहिल्यांदाच सांगवी येथे सौ.सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…

2 weeks ago

१५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी …. महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…

2 weeks ago

पुणे मेट्रोच्या नावात पिंपरी चिंचवड नावाचा समावेश करा – आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…

2 weeks ago

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

3 weeks ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 month ago