Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवडमध्ये पवनेच्या तिरावर रंगला … हरिकिर्तनातून ‘अक्रुर महाराज साखरे’ यांचा भक्तिमय स्वर …

हेचि देवा पै मागत| चरणसेवा अखंडित||
– ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील पवनेच्या तिरावर असणाऱ्या कासारवाडी येथील श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रमात कीर्तन साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,  यामध्ये विविध नामांकित कीर्तनकारांनी आपली किर्तनसेवा केली. हे श्रीविठ्ठला! तुझ्या दिव्य चरणकमलांची सेवा अखंडित, नित्य मला घडावी. हीच माझी मागणी! मला भू-वैकुंठ असणाऱ्या पंढरीत राहता यावे. माझा वास पंढरीत असावा. इथे राहिल्याने मला नित्य, सदासर्वदा हरिदासांचा संग घडेल, सत्संग घडेल. देशाच्या सेवेसाठी हुतात्मा होणाऱ्या जवानांप्रति सर्वांनी अभिमान बाळगावा. असे प्रतिपादन आपल्या हरिकिर्तनातून आज (दि.१६) रोजी ‘अक्रुर महाराज साखरे’ यांनी केले.

याप्रसंगी भाजपा प्रभारी आप्पासाहेब म्हासळकर, देविदास तात्या बारणे, अमोल कलाटे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, व्ही. एम. मातेरे, पिंपळे मामा, प्रकाश जवळकर , माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, सुभाषदादा काटे, विजयशेठ जगताप, सांगवी पोलिस स्टेशनचे पी. आय. सुनील टोणपे, अरुण पवार आदी मान्यवर तसेच परीसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

या सप्ताहात कोरोना काळात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पिंपरी चिंचवड मधील विविध डॉक्टर मंडळींचा ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मानचिन्ह, श्रीफळ,पंचा देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पंचक्रोशीतील विविध धार्मिक क्षेत्रातील विविध वैष्णवांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या किर्तन सप्ताहात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथील नियोजित संत तुकाराम महाराज मंदिर निर्माणासाठी व अनुसयानंदन गोशाळेसाठी विविध मान्यवरांनी आर्थिक मदत दिली. या सप्ताहानिमित्त आमदार लक्ष्मण भाऊ जगताप व मित्र परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना रोज अन्नदान केले जाते. प्रास्ताविक शिवानंद स्वामी महाराज यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.

उद्या ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

20 hours ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

3 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

3 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

4 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

4 days ago