महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ मे) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या संबंधित नागरिकांचे प्रश्न, तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. नागरिकांना महापालिकेच्या संबंधित असलेल्या तक्रारी आडचणी लवकरात लवकर सोडविण्याच्या अनुषंगाने जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक यांच्या सुचनेनुसार करण्यात येते.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ६२ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १३, ७, ४, ८, २, ९, ९ आणि १० तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, अजय चारठाणकर यांनी भूषवले. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित,उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे,सुषमा शिदे, विजयकुमार थोरात उपस्थित होते.
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. संभाव्य पावसाळा लक्षात घेऊन रस्त्यांची साफसफाई करणेत यावी. पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा. पावसाळ्या आधी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे करण्यात यावी. पदपथांवर उभारण्यात आलेली अतिक्रमणे काढण्यात यावी, रस्त्याच्या वरील अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या तसेच उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, अतिक्रमणाबाबत कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…