महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता घरातच पूजा करावी याकरिता … कुदळवाडीत बचत गटांच्या महिलांना वडाच्या रोपांचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २३ जून २०२१) : गुरुवारी २४ जुनला वटपौर्णिमा आहे. पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. या निमित्त कुदळवाडीत दिनेश यादव युवा मंचच्या वतीने परिसरातील बचत गटाच्या महिलांना वडाचे रोप वाटपाचा उपक्रम आज बुधवारी (दि.२३) राबविण्यात आला.

या उपक्रमात जवळपास शेकडो महिलांना वडाच्या रोपाचे वाटप करण्यात आले. वाटप केलेल्या वडाच्या रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी महिलांनी केला. यावेळी ‘फ’ प्रभाग स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संजय जगदाळे, शैलेश मोरे, नितीन मोरे, काका शेळके, प्रकाश चौधरी, रुषीकेश भालेकर परिसरातील महिला बचत गटांच्या अध्यक्षा व सदस्या उपस्थित होत्या.

कोरोना काळात कित्येक रुग्णांचा “ऑक्सिजन” विना जीव गेला आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. वृक्षारोपण होणे गरजचे आहे. त्यासाठी वडाच्या रोपांचे वाटप कुदळवाडी प्रभागातील महिला बचत गटांना करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या घरातच वडाच्या रोपाची पुजा करावी व या वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करावे, असे आवाहन आयोजक दिनेश यादव यांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना केले.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago