महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जुलै) : आज (दि.३० जुलै) जुनी सांगवी दापोडीत रस्त्याची दुरावस्था झाल्याने ‘प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे’ म्हणत मनसेच्या वतीने पाणी साठलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले. काही दिवसापासून सतत पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दोन दिवस झाले सतत तक्रारी आल्यानंतर पुन्हा मनसेच्या पदाधिकांऱ्यानी पाहणी केली आणि अनेक रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसून आल्याने हे आंदोलन करण्यात आले.
त्यातील सांगवीतील काही रस्त्याचे चंद्रमणी नगर, मधुबन सोसायटी, संगम नगर, ममता नगर, बुध्दघोष सोसायटी, PMPL मुख्य बस स्टॅाप, बॅंक ॲाफ महाराष्ट्र जवळ, शितोळे नगर तसेच दापोडी भागातही दुरावस्था झाल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्वरीत स्थापत्य विभागाला तक्रार केल्या, पण काही उपाययोजना नाही. असे यावेळी राजू दत्तू सावळे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी सांगितले.
या सर्व भागातील दुरूस्ती होत नसल्याने स्थापत्य विभागाच्या विरोधात आज सांगवीत झाडे लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे मंगेश भालेकर उपविभाग अध्यक्ष, गणेश माने शाखा अध्यक्ष,मनोज महाजन, अलेक्सझांडर आप्पा मोझेस उप विभाग, सागर भोकरे वॉर्ड अध्यक्ष,दिलीप ठोंबरे मनसे सैनिक इत्यादी नागरिकही उपस्थित होते.
दुरूस्ती वेळेत न झाल्यास “ह” प्रभाग कार्यालय येथे लवकरच मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही राजू सावळे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…