महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० नोव्हेंबर) : पंढरपूरची कार्तिक वारी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधीदिन सोहळा आणि ‘सकाळ’ पिंपरी -चिंचवडचा ३१ वा वर्धापनदिन यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन सोमवारपासून (ता. २०) केले आहे. त्याअंतर्गत आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ सोमवारी सायंकाळी पाच वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात जयेश महाराज भाग्यवंत यांचे कीर्तन होईल. त्यांच्यासह शहरातील विविध भागात नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी आणि त्यांचे पूजक भागवत तथा वारकरी संप्रदायाचा पंढरपूर येथील कार्तिक वारी सोहळा सध्या सुरू आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधीदिन सोहळा पाच डिसेंबरपासून आळंदीत सुरू होत आहे. या दोन्ही सोहळ्यानिमित्त आणि ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडच्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने कीर्तन महोत्सव होत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यात ‘सकाळ’ने कीर्तन महोत्सव आयोजित केला, या माध्यमातून संतांची शिकवण देली जात आहे. अशीच परंपरा ‘सकाळ’ने कायम ठेवावी. आमदार लक्ष्मण जगताप यांच्य स्मृतिदिनानिमित्त सोमवार कीर्तन सेवा होत आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप
प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे – ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालय, कोहिनूर बी झोन, पाचवा मजला, विजय सेल्सजवळ, पिंपरी – ९८८१०९९४३५ नटसम्राट निळू फुले नाट्यगृह : परशुराम सैद – 8888856027 संत तुकाराम मंगल कार्यालय (द्रौपदा) वाकड : गौरव – 9623153930 मा. नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे कार्यालय, चिंचवड – ७७१९०९२९२९ दिनेश ॲडव्हर्टायझिंग, निगडी प्राधिकरण – ८९७५७६१८६3 प्रशांत ऑटो केअर, नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळ, पिंपरीगाव – ९८२२६६००४६ गुरुकृपा बुक स्टॉल, भोसरी बीआरटी बसस्टॉपजवळ पुणे-नाशिक महामार्ग, भोसरी – ९८५००३९७११ अभय ॲडस्, चापेकर चौक, चिंचवड – ८९७५००२०९९ प्रतिबिंब फोटो स्टुडिओ, जुनी सांगवी, लक्ष्मीनगर – 9822343345 जिजाऊ डेअरी देवकर पथ, पिंपळे गुरव – 9881727779 किंगस्टाइल ड्रेसेस, नंदनवन कॉलनी, कृष्णा चौक, नवी सांगवी : 8087813814 अमृता कलेक्शन, दत्त मंदिर शेजारी, शिंदे वस्ती,
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…
महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, १ ऑगस्ट २०२५ :* जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव…