महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक जणांना लस … मुंबई , पुण्यात किती जणांचे लसीकरण ?

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. महाराष्ट्रात काल (1 एप्रिल) एका दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून काल एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे. राज्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आज एकाच दिवशी 3 लाख नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने उच्चांक गाठला. लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आमचा प्रयत्न राहील.

मुंबई, पुण्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद

महाराष्ट्रात कालपासून 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार काल पहिल्यांदाच 3295 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून तब्बल 3 लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. यामुळे राज्यात काल रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे या लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. पुणे जिल्ह्यात काल एकाच दिवशी तब्बल 57 हजार जणांना कोरोना लस देण्यात आली.

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

त्यापाठोपाठ मुंबईत देखील 50 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पहिल्या क्रमांकावर सातत्य राखलं आहे. महाराष्ट्रात देशभरातील सर्वाधिक 65 लाखांहून नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

17 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago